Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरंटसारखी चमचमीत मटार मेथी करण्याची सोपी ट्रिक- महागडे काजू, बटर, क्रिम घालण्याचीही गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2025 13:03 IST

Matar Methi Recipe: सध्या हिवाळा असल्याने मटार आणि मेथी दोन्हीही एकदम फ्रेश मिळत आहेत. त्यामुळे मटार मेथी रेसिपी एकदा नक्कीच करून पाहा..(how to make restaurant style matar methi?)

सध्या हिवाळा असल्याने बाजारात मेथी, मटार हे दोन्हीही भरपूर प्रमाणात मिळत आहेत. या दोन्ही भाज्या पाहिल्या की त्या लगेचच घेण्याचा मोह होतोच.. शिवाय या दिवसांत मेथीची भाजी इतर कोणत्याही ऋतूमध्ये मिळते त्यापेक्षा जास्त फ्रेश असते. म्हणूनच या दिवसांत हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्येही इतर भाज्यांपेक्षा मेथी मटार मलाई किंवा मेथी मटार या भाजीला जरा जास्त मागणी असते (how to make restaurant style matar methi?). तुम्हालाही मेथी- मटार आवडत असेल तर पुढे सांगितलेली एक सोपी रेसिपी लगेचच ट्राय करून पाहा..(matar methi recipe)

रेस्टॉरंटस्टाईल मेथी मटार रेसिपी

 

साहित्य

पावशेर मेथी आणि १ वाटी मटार

२ चमचे शेंगदाणे, २ वाळलेल्या लाल मिरच्या

२ मध्यम आकाराचे टोमॅटो आणि २ मध्यम आकाराचे कांदे

वेटलॉससाठी पिरॅमिड वॉकिंंग करण्याचा जबरदस्त ट्रेण्ड- हे कसं करायचं आणि त्याचे काय फायदे?

१० ते १५ लसूण पाकळ्या आणि ५ ते ६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. 

१ टीस्पून किसलेलं आलं

तीळ, धणे, जिरे, मीरे प्रत्येकी एकेक  टीस्पून

चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ आणि लाल तिखट 

 

कृती

सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि शेंगदाणे भाजून घ्या. यानंतर धणे, जिरे, तीळ, मिरे हे देखील एकेक करून भाजून घ्या. हे सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर थोडं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या.

महागड्या फळांपेक्षा कित्येक पटीने जास्त पौष्टिक आहे पेरू! 'हे' फायदे वाचाल तर रोज आठवणीने खाल.. 

त्यानंतर कढईमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर मिरच्या, लसूण, कांदा आणि आलं घालून परतून घ्या. कांदा परतत आल्यानंतर मटार घालून परतून घ्या. यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि थोडं मीठ घाला. सगळं परतून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मेथी घाला. मेथीही मंद आचेवर चांगली परतून झाली की मग मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटणं आणि थोडं पाणी घाला. चवीनुसार तिखट, मीठ घालून थोडी वाफ आली की मटार मेथी झाली तयार.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Easy restaurant-style matar methi recipe without expensive ingredients.

Web Summary : Enjoy restaurant-style matar methi at home. This simple recipe avoids expensive ingredients like cashews, butter, and cream. Use fresh methi and matar, with roasted spices for an authentic flavor. A quick, delicious, and budget-friendly dish!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हिवाळा