थंडीचे दिवस म्हणजे बाजारात सर्वत्र मिळणाऱ्या हिरव्यागार मटारचा मौसम. काही जणांना हिरवेगार मटार नुसते खायला आवडतात तर काही जणांना त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खावेसे वाटतात. सध्या मटार खूप स्वस्त मिळत असल्याने त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीही खूप ट्रेंडिंग आहेत. त्यापैकीच एक आहे मटार ढोकळा. एरवी ढोकळा खूप लोकांना आवडतो. आता त्या नेहमीच्या ढोकळ्याच्या चवीमध्ये थोडा बदल करा आणि मस्त खमंग मटार ढोकळा करून खा (how to make matar dhokla?).. घ्या सोपी रेसिपी (winter special matar dhokla recipe)
मटार ढोकळा रेसिपी
साहित्य
१ कप मटार
१ कप रवा आणि १ कप दही
लहान मुलांचेही केस खूप गळू लागले? जावेद हबीब सांगतात मुलांच्या नाजुक केसांसाठी सोपा उपाय
३ ते ४ हिरव्या मिरच्या, २ ते ३ लसूण पाकळ्या आणि आल्याचा लहान तुकडा
१ इनोचे सॅचेट आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता आणि जिरे
कृती
मटार ढोकळा करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये १ कप रवा, १ कप दही घ्या. त्यामध्ये १ कप पाणी घाला आणि हे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. त्यानंतर १० मिनिटे ते झाकून ठेवा.
जेवणानंतर तुम्हीही बडिशेप किंवा खडीसाखर खाता? बघा या दोन्हींचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो
तोपर्यंत मटार दाणे, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर आणि लसून पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक करून घ्या. हे मिश्रण रवा आणि दह्याच्या मिश्रणात मिसळा. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि इनो घाला.
यानंतर नेहमीप्रमाणे जसा ढोकळा लावता तसाच ढोकळा लावा आणि वरून खमंग फोडणी घाला. मस्त चवदार, खमंग मटार ढोकळा तयार.
