Join us

भजी, वडे खूप तेल पितात? शेफ पंकज सांगतात कमी तेलात भजी तळण्याची ट्रिक; कमी तेलकट कुरकुरीत होतील भजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 19:52 IST

Fry Less Oil Pakodas At Home : जास्त तेल खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. म्हणून कमीत कमी तेलात स्वंयपाक करण्याची सवय असायला हवी.  

पावसाळ्यात भजी खायला प्रत्येकालचा आवडते. पावसाळ्याच्या दिवसांत भजी आणि वडे खाण्याचे प्रमाण भरपूर वाढते. चहाबरोबर भजी खाण्याचं नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. जास्त तेलामुळे बरेच लोक भजी खाणं टाळतात. जास्त तेलाचे सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरते. (Cooking Hacks)

जास्त तेल खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. म्हणून कमीत कमी तेलात स्वंयपाक करण्याची सवय असायला हवी.  स्वत:च्या तब्येतीची काळजी घेत कमीत कमी तेलात स्वंयपाक करायला हवा. मास्टर शेफ पंकज भदौरीया यांनी कमी तेलात भजी किंवा वडे कसे तळावेत याबाबत सांगितले आहे. (Masterchef Pankaj Bhadoria Shares Genius Hacks To Fry  Less Oil Pakodas At Home)

1) तेलाचे तापमान

भजी किंवा वडे तळताना तेलाच्या तापमानाकडे लक्ष द्यायला हवं.  तेल जास्त गरम किंवा जास्त थंड असू नये. तुम्ही थंड तेलात भजी तळल्या तर भजी तेल शोषून घेतील आणि  जास्त गरम तेलामुळे तुमचा हातही जळू शकतो. भजी करपू शकतात म्हणून मध्यम गरम असलेलंच तेल घ्या. 

2) मिठाची ट्रिक

शेफ पंकज सांगतात की तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडं मीठ घाला. मीठामुळे भजी तेल कमी तेल शोषून घेतात. याशिवाय व्यवस्थित फ्रायसुद्धा होतात. तेलात जास्त मीठ घालावं लागणार नाही याची काळजी घ्या. ज्यामुळे भजी जास्त खारट होतील आणि जळण्याची शक्यता असते. 

भजीला जास्त तेल लागण्याचं कारण बेसनाचं पीठ हे असू शकतं. भजी सगळ्यात जास्त तेल एब्जॉर्ब करतात.  असं होऊ नये यासाठी भजीच्या पिठात थोडं तांदळाचे पीठ मिसळा. पण  तांदूळाचे पीठ खूप कमी प्रमाणात घालावे. नाहीतर भजीची चव खऱाब होऊ शकते. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न