Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर लोक लिंबू पाणी बनवताना करतात 'ही' एक चूक, पाहा परफेक्ट टेस्टसाठी काय कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:23 IST

Perfect Lemon Water Tips: जास्तीत जास्त लोक लिंबू पाणी तयार करताना एक अशी चूक करतात, ज्यामुळे त्याची टेस्ट बदलते आणि त्यातील पोषणही कमी होतं. चला तर पाहुयात ती चूक कोणती आहे.

Perfect Lemon Water Tips : लिंबू पाणी भारतात कोणत्याही सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात प्यायलं जातं. थकवा घालवणं असेल, पाहुण्यांचं स्वागत असेल किंवा शरीराला पोषण द्यायचं असेल तेव्हा नेहमीच लिंबू पाण्याला पहिली पसंती दिली जाते. आपणही अनेकदा लिंबू पाणी प्यायले असाल. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली असेल की, रेस्टॉरन्ट किंवा रस्त्यावर मिळणाऱ्या लिंबू पाण्याची चव घरी  केलेल्या लिंबू पाण्यापेक्षा वेगळी असते. असं का होतं? तर मुळात जास्तीत जास्त लोक लिंबू पाणी तयार करताना एक अशी चूक करतात, ज्यामुळे त्याची टेस्ट बदलते आणि त्यातील पोषणही कमी होतं. चला तर पाहुयात ती चूक कोणती आहे.

कोणती चूक केली जाते?

जास्तीत जास्त लोक हेच करतात की, एका ग्लासमध्ये थंड पाणी घेतात, त्यात साखर टाकतात आणि वरून लिंबाचा रस पिळतात. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. थंड पाण्यात साखर विरघळायला बराच वेळ लागतो. जेव्हा आपण पाणी ढवळतो, तेव्हा पाण्याचं तापमान वाढतं. आपण फक्त लिंबाच्या रसाचा वापर करतो, पण त्यातील तेल आणि सुगंध सालीमध्ये असतो.

परफेक्ट लिंबू पाणी करण्याची पद्धत

साखरेचं पाणी

आधी तर थोड्या कोमट पाण्यात साखर पूर्ण विरघळून घ्या. याने एक घट्ट मिश्रण तयार होईल. थंड पाण्यात थेट साखर टाकण्याची चूक करू नका.

लिंबू रोल करा

लिंबू पिळण्याआधी ते हातानी थोडं गोल फिरवत दावा किंवा रोल करा. असं केल्याने लिंबातील फायबर तुटतात आणि रस जास्त निघतो.

सालीचा वापर

लिंबू अर्ध कापण्याआधी त्यावरील पिवळा भाग थोडा किसून घ्या. ही किसलेली थोडी साल पाण्यात टाका. याच्या सुगंधाने आपलं लिंबू पाणी आणखी फ्रेश होईल. लिंबाचा पांढरा भाग किसू नका. असं केलं तर टेस्ट जरा कडवट लागेल.

काळं मीठ आणि जिरे पूड 

फक्त पांढऱ्या मिठाचे चांगली टेस्ट येत नाही. त्यामुळे लिंबू पाण्यात नेहमीच थोडं काळं मीठ घालावं आणि भाजलेली थोडी जिरे पूडही घालावी.

पुदिना

पुदिन्याची ४ ते ५ पाने हाताने कुस्करून पाण्यात टाका. असं केल्याने लिंबू पाण्याला नॅचरल कूलिंग इफेक्ट येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid This Mistake for Perfect Lemon Water: Tips and Tricks

Web Summary : Many make a common mistake when preparing lemon water, affecting taste and nutrition. Use warm water to dissolve sugar, roll the lemon to extract more juice, add lemon zest (avoiding the white pith), and include black salt, roasted cumin powder, and crushed mint for enhanced flavor.
टॅग्स :अन्नकिचन टिप्स