भारतीय संस्कृतीत सत्यनारायणाची पूजा आणि शुभ कार्ये प्रसादाशिवाय अपूर्ण मानली जातात. सव्वा वाटीच्या प्रमाणातील रवा आणि साखरेचा प्रसाद आपण नेहमीच खातो.(Indian dessert recipes for weddings) पण कधी मँगो शिऱ्याची चव चाखली आहे का? मऊ, लुसलुशीत आणि दाणेदार 'मँगो शिरा' हा फक्त दिसायलाच आकर्षक नसून चवीलाही अत्यंत शाही लागतो. आंब्याचा नैसर्गिक पिवळा रंग आणि त्याचा मनमोहक सुगंध शिऱ्याची लज्जत द्विगुणित करतो.(Pure ghee Mango Shira recipe )लग्नाच्या पंगतीमध्ये किंवा घरातील पूजेच्या वेळी पाहुण्यांना काहीतरी वेगळं आणि खास द्यायचं असेल, तर मँगो शिरा हा चांगला पर्याय आहे. हा शिरा करण्यासाठी फार वेळ लागत नाही, अवघ्या १५ मिनिटांत आपण परफेक्ट प्रमाणात हा पदार्थ तयार करू शकतो.(Best Mango flavored prasad recipes) अनेकदा आंबा घातल्यामुळे शिरा चिकट होतो किंवा त्याची चव बिघडते, पण योग्य पद्धत आणि प्रमाण वापरल्यास तो अगदी हॉटेलसारखा दाणेदार होतो. मँगो शिरा कसा बनवायचा, त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
साहित्य
तूप - १ वाटी बारीक रवा - १ वाटी दूध - १ वाटी केसर - ४ ते ५ काड्याचारोळी - १ चमचावेलची पूड - १ चमचासाखर - १ वाटी आंब्याचा पल्प - १ वाटी डायफ्रुट्स - आवडीनुसार
कृती
1. सगळ्यात कढईत तूप गरम रवा मंद आचेवर छान गुलाबी आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्या. रवा जेवढा चांगला भाजला जाईल, तेवढा शिरा दाणेदार होईल.
2. भाजलेल्या रव्यात गरम दूध घाला आणि सतत हलवत राहा ज्यामुळे गुठळ्या होणार नाही. रवा फुलून आला की त्यात चारोळी, वेलची पूड आणि केशर घालून ढवळा.
3. नंतर यात साखर आणि आंब्याचा रस मिसळा. आंब्याचा रस घातल्यानंतर शिऱ्याला एक सुंदर नैसर्गिक रंग येईल.
4. सर्व मिश्रण नीट एकत्र करून त्यावर २-३ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा. वरुन तळलेले डायफ्रुट्स घाला. तयार होईल दाणेदार- मऊ मँगो शिरा.
Web Summary : Mango sheera, a delightful twist on traditional prasad, is perfect for pujas and weddings. This recipe offers a quick, 15-minute method to create a soft, flavorful, and visually appealing dessert using mango pulp, avoiding a sticky or altered taste.
Web Summary : पारंपरिक प्रसाद का एक आनंदमय मोड़, मैंगो शीरा, पूजा और शादियों के लिए बिल्कुल सही है। यह रेसिपी मैंगो पल्प का उपयोग करके एक नरम, स्वादिष्ट और देखने में आकर्षक मिठाई बनाने के लिए एक त्वरित, 15 मिनट की विधि प्रदान करती है, जो चिपचिपा या बदला हुआ स्वाद नहीं देती है।