Join us

आंब्याचं रायतं करण्याची कोकणातील पारंपरिक रेसिपी, आंबट-गोड-तिखट चवीचा अप्रतिम पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 17:31 IST

Aambyache Raite : Mango Raita : Mango Rayta Recipes : Instant Mango Raita : How To Make Mango Rayta At Home : कोकणातील फेमस पदार्थ रायवळ आंब्याचं रायतं कसे करायचे याची सोपी रेसिपी...

उन्हाळ्यात आंब्याचा सिझन सुरु झाला की हमखास घरी आंब्याची पेटी आणली जाते. या दिवसांत आंबा आणि आंब्याचे पदार्थ घरोघरी हमखास मोठ्या हौसेने (Aambyache Raite) तयार केले जातात. या आंब्याच्या पदार्थांवर (Mango Raita) अगदी मनसोक्तपणे ताव मारला जातो. घरातील लहान मुलांपासून (Mango Rayta Recipes) मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आंब्याचे (Instant Mango Raita) वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात. आंब्याच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या यादीतील रायवळ आंब्याचं रायतं हा एक खास लोकप्रिय आंब्याचा पदार्थ आहे(How To Make Mango Rayta At Home).

आजही कित्येक घरांमध्ये कोकणातील हा खास आंब्याच्या रायत्याचा प्रकार मोठ्या आवडीने खाल्ला जातो. छोट्या आकाराचे रायवळ आंबे घरी आणले की त्याच रायतं तयार करण्याचा बेत होतोच. मसाल्याची तिखट आणि गुळाची गोड चवं, असं मस्त चटपटीत - मसालेदार रायवळ आंब्याचं रायतं उन्हाळ्यात खाल्लं नाही असं होतंच नाही. कोकणांत पारंपरिक पद्धतीने केलं जाणार रायवळ आंब्याचं रायतं घरच्याघरीच कसं करायचं याची रेसिपी पाहूयात.    

साहित्य :- 

१. रायवळ आंबे - गरजेनुसार२. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ३. गूळ पावडर - १ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. तेल - २ ते ३ टेबलस्पून ६. मोहरी - १ टेबलस्पून ७. लसूण - ५ ते ६ लसूण पाकळ्या

पनीर तळल्यानंतर रबरासारखे चिवट होते? १ साधीसोपी ट्रिक - तळल्यानंतरही पनीर राहील मऊमुलायम...

सांडगी मिरचीतला मसाला निघू नये म्हणून २ सोप्या ट्रिक्स - खराब न होता वर्षभर टिकेल चांगली, चवीला झणझणीत...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी रायवळ आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. २. आता कुकरमध्ये पाणी ओतून त्यात रायवळ आंबे घालून उकडवून घ्यावेत. ३. कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या काढून उकडवून घेतलेल्या आंब्याची सालं काढून घ्यावीत. 

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

४. आता सालं काढून घेतलेले आंबे एका डिशमध्ये घेऊन त्यावर आपल्या आवडीनुसार, लाला तिखट मसाला, गूळ पावडर व चवीनुसार मीठ घालून या सगळ्या मसाल्यात आंबे व्यवस्थित मॅरीनेट करून घ्यावेत. ५. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या, मोहरी घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ६. तयार फोडणीत मॅरीनेट करून ठेवलेले रायवळ आंबे घालावेत. २ ते ३ मिनिटे आंबे परतून घ्यावेत. ७. या पॅनवर झाकण ठेवून एक हलकीशी वाफ काढून घ्यावी. 

आंब्याचे चटपटीत, मसालेदार, झणझणीत रायतं खाण्यासाठी तयार आहे. आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून हे आंब्याचं रायतं खाऊ शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलफळेआंबा