Join us

गारेगार मँगो मस्तानीची एकदम भारी रेसिपी! आंब्याचे दिवस संपण्याआधी लवकर करून प्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 15:07 IST

Mango Mastani Recipe: अगदी विकतसारखीच मँगो मस्तानी घरीच करण्याची ही बघा सोपी रेसिपी...(how to make mango mastani at home?)

ठळक मुद्देमँगो मस्तानीचा १ ग्लास बाहेर १०० ते १५० रुपये या दरम्यान मिळतो. तो तुम्ही घरी अगदी कमीतकमी किमतीत करू शकता.

उन्हाळा आता सरत आला आहे. त्यामुळे साहजिकच आंब्याचे दिवसही आता संपत आले आहेत. म्हणूनच आंब्याचे किंवा कैरीच वेगवेगळे पदार्थ करून खायचे असतील तर आता थोडी घाई करायला हवी. कारण हा सिझन संपला तर पुन्हा या पदार्थांची चव चाखण्यासाठी पुढच्यावर्षीपर्यंत वाट पाहावी लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे मँगो मस्तानी. जेवण झाल्यानंतर अनेक जण रात्रीच्यावेळी घराबाहेर पडतात आणि गारेगार मँगो मस्तानीचा आस्वाद घेऊन येतात. उन्हात फिरून थकल्यानंतर घशाला कोरड पडते. अशावेळी प्यायलाही मँगो मस्तानी छान वाटते (mango mastani recipe in marathi). मँगो मस्तानीचा १ ग्लास बाहेर १०० ते १५० रुपये या दरम्यान मिळतो. तो तुम्ही घरी अगदी कमीतकमी किमतीत करू शकता (mango mastani recipe). म्हणूनच बघा मँगो मस्तानीची ही स्वस्तात मस्त रेसिपी..(how to make mango mastani at home?) 

मँगो मस्तानी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ मोठ्या आकाराचा आंबा

व्हॅनिला आईस्क्रिम किंवा मँगो आईस्क्रिम २ स्कूप

टुटी फ्रुटी १ ते दिड टेबलस्पून

फक्त २ आठवडे चिया सीड्स नियमितपणे खाऊन पाहा- वेटलॉस होऊन मिळतील भरपूर फायदे..

काजू, बदाम, पिस्ते असे सुकामेव्याचे तुकडे एक ते दिड टेबलस्पून

कृती

सगळ्यात आधी तर एक मोठा आंबा घ्या आणि त्याचे दोन भाग करा. बर्फ आणि दूध घालून अर्ध्या आंब्याचा रस करा आणि अर्ध्या आंब्याचे बारीक काप करून ठेवा.

 

आता एक ग्लास घ्या. त्या ग्लासमध्ये सगळ्यात खाली आंब्याचा रस घाला. त्यावर थोडं व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रिम घाला.

त्यावर थोडी टुटी फ्रुटी टाका. त्यावर आंब्याचे तुकडे आणि पुन्हा थोडा रस घाला.

देखण्या पैठणीवरचं ब्लाऊजही सुंदरच हवं.. बघा ७ स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स- पैठणी आणखी उठून दिसेल

आता सगळ्यात वर पुन्हा थोडं आईस्क्रिम, त्यावर थोडे आंब्याचे काप आणि वर सुकामेवा तसेच टुटीफ्रुटी असं घाला. मस्त गारेगार मँगो मस्तानी तयार.. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आंबासमर स्पेशल