फ्लॉवरच्या भाजीसारखी दिसणारी ब्रोकोलीची भाजी खूप जण आवर्जून करत नाहीत. कारण ती कशी करावी हे समजत नाही. किंवा काही लोक ज्या पद्धतीने ब्रोकोली करतात, त्या पद्धतीने तिला विशेष चव आल्यासारखी वाटत नाही. असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर मलई ब्रोकोली ही एक रेसिपी ट्राय करून पाहा. ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा मग भाजी म्हणूनही पोळीसोबत, भातासोबत खाऊ शकता (how to make malai broccoli?). मलई ब्रोकोली एवढी चवदार लागते की घरातल्या बच्चे कंपनीलाही ती नक्कीच आवडेल.(Malai Broccoli Recipe)
मलई ब्रोकोली रेसिपी
साहित्य
१ ते दिड कप चिरलेली ब्रोकोली
२ टेबलस्पून घट्ट दही
१ टेबलस्पून काजूची पेस्ट
सकाळच्या उरलेल्या वरणापासून रात्री करा ५ चटपटीत पदार्थ, वरण वाया जाण्याचं टेन्शनच नाही
मिरेपूड, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड प्रत्येकी १ टीस्पून
१ टेबीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून बटर
चवीनुसार मीठ
कृती
ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी ब्रोकोली चिरून घ्या. यानंतर पाण्यात घालून ती १० मिनिटे गरम करा आणि मग त्यातले पाणी काढून घ्या. तसेच काजूची पेस्ट तयार करून घ्या.
हिवाळ्यासाठी स्टायलिश, ट्रेण्डी स्वेटर घ्यायचं? खिशाला परवडणाऱ्या किंमतीत घ्या हटके डिझाईन्स
यानंतर दुधामध्ये काजू भिजत घालून त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्या. आता एका मोठ्या भांड्यामध्ये दही घ्या. त्यात काजुची पेस्ट, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर, इतर मसाले आणि ब्रोकोली घाला.
सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि दह्यामध्ये १५ ते २० मिनिटे ब्रोकोली भिजू द्या. यानंतर तव्यावर किंवा कढईमध्ये बटर घाला आणि मॅरिनेटेड ब्रोकोली फ्राय करून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. अतिशय चवदार अशी मलई ब्रोकोली तयार..
