Lokmat Sakhi >Food > वाटीभर बेसनाच्या सुरळीच्या वड्या पोटभर खा, सुरळीची वडी चुकूच शकत नाही अशी सोपी आणि झटपट रेसिपी

वाटीभर बेसनाच्या सुरळीच्या वड्या पोटभर खा, सुरळीची वडी चुकूच शकत नाही अशी सोपी आणि झटपट रेसिपी

making Surlichi Vadi is easy and quick that you can't miss : पाहा सुरळीची वडी करण्याची अगदी सोपी रेसिपी. पोटभर खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 19:06 IST2025-04-16T19:03:44+5:302025-04-16T19:06:33+5:30

making Surlichi Vadi is easy and quick that you can't miss : पाहा सुरळीची वडी करण्याची अगदी सोपी रेसिपी. पोटभर खा.

making Surlichi Vadi is easy and quick that you can't miss. | वाटीभर बेसनाच्या सुरळीच्या वड्या पोटभर खा, सुरळीची वडी चुकूच शकत नाही अशी सोपी आणि झटपट रेसिपी

वाटीभर बेसनाच्या सुरळीच्या वड्या पोटभर खा, सुरळीची वडी चुकूच शकत नाही अशी सोपी आणि झटपट रेसिपी

सुरळीची वडी म्हणा नाही तर खांडवी. चवीला हा पदार्थ अगदी मस्त लागतो. करायला फारच सोपा आहे. (making Surlichi Vadi is easy and quick that you can't miss.)घरीच करा आणि मग पोटभर खा. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य(making Surlichi Vadi is easy and quick that you can't miss.)
बेसन, मीठ, हिरवी मिरची, दही, हळद, नारळ, कडीपत्ता, जिरे, ओलं खोबरं, तेल, कोथिंबीर, मोहरी, आलं, पाणी, साखर

कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घ्या. त्यामध्ये बेसन घाला. दही आणि बेसन समप्रमाणात वापरा. जर एक वाटी दही घेत आहात, तर मग बेसनही एक वाटी घ्यायचे. दही व बेसन घेतल्या नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. बारीक चिरलेली मिरची घाला. तसेच त्यामध्ये किसलेले आले घाला. पदार्थ आधीच बारीक केले की मिश्रणात व्यवस्थित एकजीव होतात. म्हणून सगळं बारीक करुनच मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यामध्ये हळद घाला. 

२. ते मिश्रण व्यवस्थित वाटून घ्या. नंतर एका पातेल्यावर गाळण ठेवा आणि वाटलेले पीठ त्यावर ओता. चमच्याच्या मदतीने पीठ गाळणीतून गाळून घ्या. उरलेला चोथा काढून टाका. आता पातेल्यामधील बेसनाच्या पीठामध्ये चमचाभर साखर घाला. एक वाटी बेसन घेतले असेल तर दोन वाटी पाणी घ्यायचे. मिश्रण छान ढवळून घ्या. मग ते गॅसवर चढवा. सतत ढवळत राहा. मंद आचेवर बेसन शिजवून घ्या. हळूहळू ते जरा घट्ट होईल. 

३. आकाराला मोठी असणारी ताटे वापरा. ताटे किंवा ताटली उलटी ठेवा. बेसनाचे शिजलेले मिश्रण चमच्याच्या मदतीने ताटलीवर पसरवून घ्या. पातळ थर लावा जास्त जाड नको. त्यावर मस्त खवलेले ओले खोबरे टाका. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. 

४. छान फोडणी करुन घ्या. त्यासाठी तेल तापत ठेवा. त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घाला. तसेच जिरे घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. फोडणी छान खमंग झाली की मग ताटावर पसरवलेल्या बेसनावर व्यवस्थित फोडणी पसरवा. सुरीच्या मदतीने ताटलीवरील मिश्रणाला लांब लाबं चिरा द्या. गार झाल्यावर बोटांचा वापर करुन वडीचा रोल करुन घ्या. वरतून पुन्हा फोडणी घाला.     

Web Title: making Surlichi Vadi is easy and quick that you can't miss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.