नवरात्रोत्सवाला नुकतीच मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. आता नवरात्र म्हटलं की कित्येक घरांमधले लोक ९ दिवस उपवास करतात. सुरुवातीला उत्साहाच्या भरात उपवासाचा थकवा जाणवत नाही. पण नंतर मात्र थोडं गळून गेल्यासारखं होतं. शिवाय तेच ते उपवासाचे पदार्थ खाऊनही कंटाळा येतोच. म्हणूनच अशावेळी चवीमध्ये बदल म्हणून आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशीर म्हणून मखाना खीर खाऊन पाहा. मखाना हे खूप आरोग्यदायी असून ते झटपट एनर्जी देतात (Navratri vrat special makhana kheer). म्हणूनच उपवासाची मखाना खीर कशी करायची ते पाहूया..(how to make makhana kheer?)
उपवासाची मखाना खीर करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी मखाना
१ चमचा तूप
४ वाट्या दूध
नवरात्रीचे उपवास करताना ५ चुका टाळा, तब्येत बिघडेल- ९ दिवस आनंदात उपवास करायचे तर...
पाऊण वाटी साखर
१ टीस्पून वेलची पूड
२ टेबलस्पून सुकामेव्याचे काप
केशराच्या ७ ते ८ काड्या
कृती
मखाना खीर करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एकीकडे दूध गरम करून थोडं आटवायला ठेवा.
त्यानंतर दुसऱ्या गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात थोडं तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुकामेवा तळून घ्या. यानंतर सुकामेवा कढईतून बाहेर काढून घ्या. त्यानंतर कढईमध्ये मखाना घालून ते ही तुपामध्ये परतून घ्या.
पाठ दुखणं थांबेल, स्ट्रेस कमी होईल, केसही वाढतील! आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते खास उपाय
यानंतर मखान्यांमध्ये थाेडं आटवून घट्ट झालेलं दूध घाला. दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर, वेलचीपूड, केशराच्या काड्या घाला आणि नंतर सगळं मिश्रण चांगलं उकळू द्या. खिरीला थोडा दाटसरपणा आल्यानंतर गॅस बंद करा. चवदार, सुगंधी मखाना खीर तयार.