डोसा आवडतो का? काही साऊथ इंडियन पदार्थ आहेत, जे सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. (Make Vari Dosa during fasting, it will fill your stomach and is also easy to digest)नाश्त्यासाठी तर अगदी आवर्जून हे पदार्थ आपण खातो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे डोसा. रव्याचा डोसा असतो. मिश्र डाळींचाही डोसा केला जातो. विविध प्रकार असतात. पण कधी उपासाला चालणारा डोसा खाल्लात का? चवीला अगदी मस्त असतो. साधा डोसा जसा कुरकुरीत होतो, अगदी तसाच कुरकुरीतही होतो. (Make Vari Dosa during fasting, it will fill your stomach and is also easy to digest)करायला अगदीच सोपा आहे. आता उपासाला तेच पदार्थ करु नका एकदा हा डोसाही करुन पाहा.
साहित्य
वरी तांदूळ, साबुदाणा, मीठ, पाणी, बटाटा, हिरवी मिरची, आलं, दही, जिरं, तूप
कृती
१. बटाटे उकडून घ्यायचे. दोन लहान बटाटे पुरेसे होतात. जास्त बटाटे घेऊ नका. डोसा चिवट होईल. बटाटे उकडून झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची. बटाटे छान गार करुन घ्यायचे.
२. गॅसवर पॅन गरम करत ठेवायचा. पॅन गरम झाल्यावर त्यात साबुदाणा घालायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा. करपणार नाही याची काळजी घ्यायची. साबुदाणा वाटीभर घ्यायचा. पुरेसा होतो.
३. एका मिक्सरच्या भांड्यात परतलेला साबुदाणा घ्यायचा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच उकडलेला बटाटा घालायचा. आल्याचा लसानसा तुकडा घालायचा. जिरे घालायचे. त्यात वाटीभर वरी तांदूळ घालायचा. चवीपुरते मीठ घालायचे आणि थोडे पाणी घालायचे. गोड असे दही घालून मग मिक्सरमधून मिश्रण वाटून घ्यायचे.
४. सगळे पदार्थ मस्त एकजीव व्हायला हवेत. सगळे पदार्थ व्यवस्थित वाटले जातील याची काळजी घ्यायची. पेस्ट एका खोलगट पातेल्यात काढून घ्यायची. त्यात पाणी घालायचे. चव पाहायची पुन्हा गरजेनुसार मीठ घालायचे. पंधरा मिनिटांसाठी मिश्रण झाकून ठेवायचे.
५. एका पॅनमध्ये किंवा नॉनस्टीकी तव्यावर डोसा लावायचा. त्यासाठी तवा जरा गरम करुन घ्यायचा. तव्यावर छान पसरवून डोसा लावायचा. बाजूने तूप घालायचे. डोसा छान कुरकुरीत होईल आणि सुटेल मग परतून दुसऱ्या बाजूनेही परतायचा. दह्याशी किंवा चटणीशी लावा आणि गरमागरम खा.