भातावर घ्यायला आमटी वरण तर असतेच मात्र काही विविध पदार्थही असतात. चवीला मस्त असे हे पदार्थ करायला अगदी सोपे असतात. (Make tomato saar for dinner, summer special tasty recipe) त्यापैकी एक म्हणजे टोमॅटोचे सार. हे सार चवीला फारच मस्त असते. साध्या भातासोबत ते खातातच मात्र मसाले भात व साराची जोडी काही औरच आहे. पाहा गरमागरम चविष्ट टोमॅटो सार कसे कराल.
साहित्यटोमॅटो, पाणी, लसूण, अख्खे धणे, हळद, ओलं खोबरं, लाल तिखट, मीठ, तेल, मोहरी, कडीपत्ता, चिंच, गूळ, तमालपत्र
कृती१. टोमॅटोचे तुकडे करुन घ्या. गॅसवर पाणी तापत ठेवा. पाणी उकळल्यावर त्यामध्ये टोमॅटो घाला. पाणी अगदी थोडेच ठेवा. (Make tomato saar for dinner, summer special tasty recipe)फक्त टोमॅटो शिजतील एवढेच पाणी वापरा. त्यामध्ये एक तमालपत्राचे पान घाला. एकीकडे एका वाटीमध्ये अगदी थोडी चिंच भिजवत ठेवा.
२. टोमॅटो मस्त शिजल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे टोमॅटो काढून घ्या. तुम्हाला जर सालं काढायची असतील तर सालं काढून घ्या. साराला सालं अजिबात नडत नाहीत त्यामुळे नाही काढली तरी हरकत नाही.
३. टोमॅटो घेतल्यावर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. अख्खे धणे घाला. त्यामध्ये ओलं खोबरं घाला. पातळ काप घालू शकता किंवा किसलेला नारळ घालू शकता. भिजवलेल्या चिंचेची बी काढून घ्या. पाण्यासकट चिंच मिक्सरमध्ये घाला. त्यामध्ये अगदी थोडा गूळ घाला. सगळं छान वाटून घ्या. अगदी पातळ एकजीव पेस्ट करा.
४. एका कढईमध्ये तेल घ्या. तूप वापरले तरी चालेल. ते जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात कडीपत्याची पाने घाला. कडीपत्ता छान फुलला की त्यात हळद लाल तिखट घाला आणि लगेच वरतून टोमॅटोची पेस्ट घाला म्हणजे तिखट करपणार नाही. फोडणीमध्ये तिखट घातल्यामुळे छान तवंग येतो.
५. सारात चवीपुरते मीठ घाला आणि सार ढवळून घ्या. सारावर झाकण ठेवा मस्त उकळी येऊ द्या. सार उकळल्यावर गरज असेल तर पाणी घाला.