आपला रोजचा आहार म्हणजे पोळी, भाजी आमटी आणि भात. मग तोंडी लावायला कधी चटणी तयार केली, तर कधी लोणचं वापरलं. (Make Three Tasty Rotis From Wheat Floor )कधी तरी मग या चौकटीतल्या आहारा आहाराला सुट्टी मग खिचडी करायची. आणि पापडही भाजायचे. असे पर्याय आपण निवडत असतो. रोज काही नवीन तयार करणे शक्य नाही. किंवा सतत तळलेले अपौष्टिक अन्न तयार करू शकत नाही. घरी लहान मुलं असली की मात्र मग जरा तारेवरची कसरत करावी लागते. त्यांना रोज साधी पोळी चालत नाही. मग कधी पराठा हवा. (Make Three Tasty Rotis From Wheat Floor )कधी घावन हवे. असे प्रकार त्यांना लागतात.
आपली साधी पोळी रोज खायला त्यांना आवडत नाही. मग नवीन काय तयार करू ? असा प्रश्न पडतो. काही काळजी करायची गरज नाही. (Make Three Tasty Rotis From Wheat Floor )गव्हाच्या पीठात म्हणजेच कणकेमध्ये अगदी मोजके पदार्थ घालून मग पोळी लाटायची. ती चवीलाही मस्त लागते आणि पराठा म्हणून फस्तही होते.
१. कसुरी मेथी आपण आमटी, फोडणीचे वरण आदी पदार्थांसाठी वापरतो. पण कसुरी मेथीचा वापर करून मस्त पदार्थ तयार करता येतो. रोज सारखीच कणीक मळायची त्यामध्ये फक्त कसुरी मेथी हातावर जरा मळून घेऊन घालायची. एखादी लसूण ठेचून घाला. थोडे पांढरे तीळ घाला. चिमटीभर हळद घाला. आणि मग नेहमी करता तशीच पोळी तयार करा. तूप लावलेत तर उत्तमच.
२. पोळीचे पीठ मळताना त्यामध्ये घरात उपलब्ध असलेले मसाले घालायचे. मीठ घालायचे. लाल तिखट घालायचे. जिरं घालायचं. छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मसाले घातले नाहीत, तरी चालेल पण धने पूड घाला. अगदी छान अशी कोथिंबीरीची पोळी तयार होते.
३. कणीक मळताना त्यामध्ये धने-जिरं पावडर घाला. मग अगदी बारीक चिरलेला कांदा जरा परतून घ्या. तो गुलाबी झाला की, मग तो ही कणकेत घाला. एखादी मिरची अगदी बारीक चिरून घाला. चवीला फारच छान लागतात. कांद्यामुळे पोळी टम्म फुगत नाही. पण खुसखुशीत होते.