चटण्या विविध चटण्या आपण विकत घेतो. तसेच लोणचेही विकत मिळते. इतरही अनेक तोंडी लावण्याचे पदार्थ आपण विकत आणतो. मात्र घरी केलेले जास्त चविष्ट लागतात हे मात्र नक्की. (Make this delicious, spicy and tasty Shejwan Chutney at home now, you will forget the taste of the store-bought one forever)अनेक प्रसिद्ध चटण्या आपण खातो मात्र फार लोकप्रिय ठरते ती शेजवान चटणी. फार काही वेगळी नसते लाल मिरचीचा ठेचा जसा केला जातो जवळपास तशीच रेसिपी आहे. हॉटेलपेक्षा मस्त शेजवान चटणी घरी करणे अगदी सोपे आहे. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य काश्मीरी लाल मिरची, साधी लाल मिरची, पाणी, लसूण, तेल, आलं, मीठ , कोथिंबीर, तेल , साखर
कृती१. काश्मीरी लाल मिरचीच्या आतल्या बिया काढून टाकायच्या. तसेच साध्या मिरचीच्याही बिया काढायच्या. मग एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचे. गरम पाण्यात मिरची भिजत घालायची. तासभर तरी मिरची भिजवायची. नंतर त्यातील थोडे पाणी काढून टाकायचे. (Make this delicious, spicy and tasty Shejwan Chutney at home now, you will forget the taste of the store-bought one forever)थोडे पाणी ठेवायचे. मिरची भिजवल्याने पाणी फार तिखट होते त्यामुळे सगळे घ्यायचे नाही. एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मिरची घ्यायची त्याची पेस्ट करायची.
२. लसूण भरपूर वापरायचा. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करायचे. लसूण चिरायचा. मिरचीपेक्षा जास्त लसूण घ्यायचा. तसेच आलं किसून घ्यायचे. आलं अगदी नावापुरते घ्या. कोथिंबीरही बारीक चिरुन घ्यायची.
३. एका कढईत तेल घ्यायचे. चांगले चार चमचे भरुन तेल घ्या. तेल जरा तापले की त्यात बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूण जरा परतायचा मग त्यात. लसणाची पेस्ट घालायची. मस्त परतायची. त्याला तेल सुटायला लागेल. मग त्यात चमचाभर साखर घालायची. चवीपुरते मीठ घालायचे. कोथिंबीर घालायची. सगळं छान परतायचं. तेल कमी वापरु नका. तेल जास्तच वापरा.
४. चटणी आटेपर्यत परतायची. छान घट्ट होते. जरा जास्त वेळ परतायचे. त्यात घट्टपणासाठी इतर काही घालायची गरज पडत नाही.
५. त्यात काही जण टोमॅटो सॉस घालतात. तसेच सोया सॉसही घालतात. त्याची चवही छानच लागते.