आज कोणती भाजी? अगदी रोजचाच पडणारा प्रश्न असला तरी उत्तर काय मिळत नाही. त्याच भाज्या करुन कंटाळा आला की काही तरी वेगळा पदार्थ करुन पाहायचा. ( Make this amazing dish in just 10 minutes, the vegetable is amazing use good amount of malai)घरात कोणतीच भाजी नसेल तर झटपट ही भाजी करता येते. फक्त दुधाची छान ताजी मलाई म्हणजेच साय घरात असली पाहिजे. म्हशीच्या दुधाची साय जास्त चविष्ट लागते. पाहा अगदी झटपट मलाई भाजी करायची रेसिपी.
साहित्य
कांदा, टोमॅटो, लसूण, तेल, हिंग, कोथिंबीर, ताजी साय, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला
कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या मग लसूण छान बारीक चिरुन घ्यायचा. तसेच दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे. सोलायचे आणि मस्त बारीक चिरायचे. दोन टोमॅटो घ्यायचे. ( Make this amazing dish in just 10 minutes, the vegetable is amazing use good amount of malai)ते ही अगदी बारीक चिरायचे. टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या. हिरव्या मिरचीचे छान बारीक तुकडे कारायचे. कोथिंबीरही छान निवडायची आणि मग बारीक चिरुन घ्यायची. छान ताजी कोथिंबीरीची जुडी वापरायची.
२. एका कढईत दोन चमचे तेल घ्यायचे. त्यात दोन चमचे हिंग घालायचे आणि हिंग घातल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घालायचा. जरा वेळ परतायचे. मग त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची घातल्यावर त्यात कांदा घालायचा. कांदा छान खमंग परतायचा. कांदा गुलाबीसर दिसायला लागल्यावर त्यात टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा मस्त परतून घ्यायचा. मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
३. भाजीत थोडे मीठ घालायचे आणि दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचे. कांदा टोमॅटो जरा मऊ होतील मग त्यात गरम मसाला घालायचा. तसेच आवडीनुसार लाल तिखट घालायचे. तुम्हाला तिखट आवडत नाही तर घालू नका. त्यात चमचाभर हळद घालायची. सगळे मसाले छान ढवळून घ्यायचे. त्याचा खमंग वास पसरल्यावर त्यात ताजी दुधावरची साय घालायची आणि सगळे पदार्थ एकजीव करायचे. जरा दोन मिनिटे परतायचे मग गॅस बंद करा आणि गरमागरम खायला घ्या.