Join us

तासंतास दूध न आटवता करा घट्ट-रवाळ रबडी! मोजून ५ मिनिटांत रबडी करण्याची इन्स्टंट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2025 13:27 IST

Make thick, creamy rabri without boiling milk for hours! Instant recipe to make rabri in just 5 minutes : झटपट रबडी करायची सोपी पद्धत. एक टिप लक्षात ठेवा.

रबडी हा पदार्थ भारतात फार लोकप्रिय आहे. रबडी करायला एकदम सोपी आहे. मात्र दाणेदार, मऊ आणि रसरशीत रबडी तयार करणे फार कठीण असते. (Make thick, creamy rabri without boiling milk for hours! Instant recipe to make rabri in just 5 minutes)पद्धत सोपी असते मात्र ढवळताना हाताची वाट लागते. भरपूर वेळ ढवळावे लागते. त्यात थोडे दही वापरले जाते. मात्र एक पदार्थ वापरुन मस्त दाणेदार रबडी पाच मिनिटांत करता येते. पाहा सोपी रेसिपी.  

साहित्य दूध, कंडेंस्ड मिल्क, ब्रेड, बदाम, काजू, वेलची पूड, खवा, साखर, पिस्ता, तूप  

कृती१. ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या. ब्रेडचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे. चुरा करायचा. जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरवायचे नाही त्याचा लगदा होईल. ब्रेडमुळे रबडी घट्ट होते. तसेच ब्रेड दूध शोषून घेतो आणि त्यामुळे चव मस्त लागते.

२. तसेच बदाम आणि काजू जरा परतून घ्यायचे. छान तुपावर परतायचे. त्याचे तुकडे करायचे. अगदी चुरा करु नका. फक्त तुकडे करायचे. पिस्ताही मधे तोडून घ्यायचा. तुम्हाला आवडणारे इतरही पदार्थ घेऊ शकता. सुकामेवा जो आवडतो तो घ्यायचा. 

३. गॅसवर दूध तापत ठेवायचे. त्यात वाटीभर कंडेंस्ड मिल्क घालायचे. दूध मस्त ढवळायचे. दोन्ही पदार्थ छान एकजीव झाल्यावर दूध थोडे घट्ट होईल. मग त्यात थोडी साखर घाला. साखर अगदी कमी घाला. नाही घातली तरी चालेल कारण कंडेंस्ड मिल्क फार गोड असते. त्यामुळे गरजे पुरता गोडवा रबडीला येतो. 

४. मिक्सरमधून फिरवून घेतलेले ब्रेडचे तुकडे त्यात घालायचे. छान ढवळायचे. दूध आणि ब्रेडचा चुरा एकजीव करायचा. त्यात थोडा खवा घालायचा. खवा नसेल तर थोडे पनीरही चालेल. पण खव्यामुळे येणारी चव मस्त असते. त्यात चमचाभर वेलची पूड घालायची. तसेच काजू बदामाचा तुकडे घालायचे आणि मस्त ढवळून घ्यायचे. रबडी काही मिनिटांतच घट्ट होते. मग गॅस बंद करायचा आणि रबडी गार करायची. 

५. गरम रबडी छान लागते. मात्र थंडगार रबडी खाण्याची मज्जाच काही और आहे. रबडी तयार झाल्यावर वरतून पिस्ता घालायचा. तसेच आवडत असल्यास थोडे तूप घालायची. मस्त रबडी तयार होते आणि चवीला मस्त लागते.   

टॅग्स :अन्नभारतीय खाद्यसंस्कृतीपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.