आपण हेल्दी म्हणून सॅण्डविच खातो खरे, पण ब्रेड खरंच पौष्टिक असतो का? हा प्रश्न तसा वादात्मकच आहे. अनेकांना ब्रेड पौष्टिक वाटतो तर, अनेकांना वाटत नाही. (Make semolina sandwiches without using bread! Easy, crunchy and nutritious)पण हे सॅण्डविच नक्कीच पौष्टिक आहे कारण त्यात ना ब्रेड आहे ना बटर. तुम्ही म्हणाल ब्रेडच तर महत्त्वाचा असतो. पण ब्रेडची जागा रव्याचे मिश्रण घेऊ शकते. दही रवा यांचा वापर करुन छान पौष्टिक सॅण्डविच करणे अगदीच सोपे आहे. पाहा सोपी रेसिपी .
साहित्यरवा, दही, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बेकींग सोडा, काळी मिरी पूड, मीठ, पाणी, तेल/तूप
कृती१. एका खोलगट पातेल्यात रवा घ्यायचा. त्यात थोडे दही घालायचे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचे. छान एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवायचे आणि थोडा वेळ रवा फुलू द्यायचा. किमान तासभर तरी तसेच ठेवायचे. भाज्या मस्त बारीक चिरुन घ्यायच्या. कांदा सोलून घ्या आणि बारीक चिरुन घ्या. तसेच सिमला मिरचीही बारीक चिरायची. टोमॅटोच्या बिया काढायच्या आणि गर बारीक चिरायचा.
२. रव्याच्या मिश्रणात सगळ्या चिरलेल्या भाज्या घालायच्या आणि आणखी थोडे दही घालायचे. पाणी घालायचे. पातळ होणार नाही याची काळजी घ्या. पीठ जरा घट्टच राहू द्यायचे. पातळ झाले तर त्याचा ब्रेड होणार नाही. टोस्ट होणार नाही.
३. भाज्या घालून झाल्यावर त्यात काळी मिरी पूड घालायची. थोडा बेकींग सोडा घालायचा. सगळं छान ढवळून घ्यायचे. मस्त पीठ तयार झाल्यावर सॅण्डविच मेकर घ्यायचा आणि त्याला तेल लावायचे. अगदीच हेल्दी हवे असेल तर तेल न वापरता तूप वापरायचे. स्टोस्टरवर तयार केलेले पीठ नीट लावायचे. जास्त लावायचे नाहीत. बाहेर नाही येणार याची काळजी घ्यायची. मात्र अगदी कमीही लावायचे नाही. योग्य प्रमाणात मिश्रण लावा आणि दोन्ही बाजूंनी नीट शिजू द्यायचे. गॅस कमीच ठेवा.
इलेक्ट्रिक असेल तर आणखी उत्तम. चिकटणारही नाही. सॅण्डविचसारखे दिसायला लागले आणि सुटले की लगचे काढून घ्यायचे. सॉस किंवा आवडत्या चटणीसोबत मनसोक्त खा.