Join us

तेल तूप एक थेंबही न घालता करा मऊमोकळी साबुदाणा खिचडी! उपवास करा मजेत, खा निवांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 15:28 IST

Make sabudana khichdi without oil : No oil soft sabudana khichadi : Oil-free sabudana khichadi for fasting : Zero oil sabudana : How To Make Sabudana Khichdi Without Oil For Fasting : उपवासाला तेलकट - तुपकट साबुदाण्याची - खिचडी- वडे खातो, परंतु आरोग्याच्या दृष्टीने तेल न वापरता खिचडी करण्याची रेसिपी...

सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असल्याने, येणाऱ्या सणावाराला आपल्यापैकी अनेकांचे हमखास उपवास असतात. उपवास म्हटलं की मोजकेच पदार्थ खावे लागतात, या उपवासाच्या (Make sabudana khichdi without oil) पदार्थांमध्ये सगळ्यांच्याच आवडीचा आणि झटपट होणारा पदार्थ म्हणजे (No oil soft sabudana khichadi) साबुदाण्याची खिचडी. गरमागरम आणि चविष्ट साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने उपवासाच्या (Oil-free sabudana khichadi for fasting) दिवशी पोट भरलेले राहते आणि ऊर्जाही मिळते. उपवास कोणताही आणि कधीही असो साबुदाणा खिचडी (Zero oil sabudana) खाल्ली नाही तर उपवास असल्यासारखे वाटतच नाही. साबुदाणा खिचडी मऊ - मोकळी आणि सुटसुटीत होण्यासाठी आपण तेलातुपाचा वापर करतो(How To Make Sabudana Khichdi Without Oil For Fasting).

तेल - तूप वापरल्याने काहीवेळा खिचडी खूप जास्त तेलकट - चिपचिपित होते. खिचडीत जास्तीचे तेल तूप घालणे हे आरोग्याच्या दृष्टीने देखील फारसे चांगले नाही.  यासोबतच, जास्त तेलामुळे ती पचायलाही अधिक जड होते. अशा परिस्थितीत, आपण नेहमीच्या खिचडी करण्याच्या रेसिपीला थोडासा ट्विस्ट देत, वेगळ्या पद्धतीने देखील तेल - तूप न वापरता खिचडी करु शकतो. जर तुम्हाला उपवासाची साबुदाणा खिचडी आरोग्यदायी आणि कमी तेलकट करायची असेल तर खिचडी करण्याची ही खास नवीन रेसिपी पाहूयात... यंदाच्या उपवासाला तेल - तूप एक थेंबही न घालता मऊमोकळी साबुदाणा खिचडी करण्याची ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.. 

साहित्य :- 

१. साबुदाणा - १ कप (भिजवलेला)२. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून (पर्यायी)३. जिरेपूड - १ टेबलस्पून४. मीठ - चवीनुसार५. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारिक चिरलेल्या)६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली - पर्यायी)७. बटाटा - १ कप (उकडलेला बटाटा)८. शेंगदाणे - १ कप (तेलात तळून घेतलेले)९. डाळिंबाचे दाणे - १/२ कप १०. फराळी चिवडा - १ कप११. लिंबाचा रस - १ टेबलस्पून (पर्यायी)

श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

कृती :- 

१. सगळ्यात आधी साबुदाणे नेहमीप्रमाणे ५ ते ६ तास पाण्यांत भिजवून घ्यावेत. २. भिजवून घेतलेले साबुदाणे एका बाऊलमध्ये किंवा स्टीलच्या वाटीत भरुन घ्यावेत. एका मोठ्या कढईत किंवा भांड्यात पाणी घेऊन त्यात ते साबुदाणे ठेवून वरून झाकण ठेवून साबुदाणे उकडवून घ्यावेत. 

श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...

श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...

३. उकडवून घेतलेले साबुदाणे एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात चवीनुसार मीठ, काश्मिरी लाल मिरची पावडर, जिरेपूड, बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेल्या बटाट्याचे छोटे तुकडे, तळून घेतलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, फराळी चिवडा व लिंबाचा रस घालावा. आता चमच्याने हे सगळे जिन्नस मिसळून घ्यावेत. 

तेलाचा थेंबही न वापरता उपवासाची साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीश्रावण स्पेशलश्रावण स्पेशल पदार्थ