Join us

रेस्टोरंटसारखे कुरकुरीत दही पनीर कबाब बनवा घरच्या घरी, लज्जतदार रेसिपीची जाणून घ्या कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2022 16:08 IST

Dahi Paneer Kebab लज्जतदार दही पनीर कबाब खाण्याची इच्छा झाली ? रेस्टोरंटमध्ये जाण्याची गरज नाही, घरीच बनवा ही सोपी रेसिपी

स्टार्टर म्हंटलं की आपण मेन कोर्सच्या आधी कबाब, कटलेट, मसाला पापड, पनीर चिल्ली असे पदार्थ ऑर्डर करतो. हे पदार्थ खायला प्रचंड चविष्ट लागतात. परंतु ,घरी ट्राय करून पाहिले की ते पदार्थ रेस्टोरंटसारखे तयार होत नाही. स्टार्टरमध्ये प्रत्येकाला दही पनीर कबाब हा पदार्थ आवडलाच असेल. हा पदार्थ आपण घरी देखील ट्राय करून पाहिलं असेल. मात्र, रेस्टोरंटसारखे तयार झाले नसेल. आज आपण दही पनीर कबाब करून पाहणार आहोत, ज्याची योग्य पद्धत यासह काही टिप्स फॉलो करुन केली तर, रेस्टोरंटसारखी चव नक्कीच येईल.

दही पनीर कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य

दही - 1/2 कप 

किसलेले पनीर - 1/2 कप 

बारीक चिरलेला कांदा - 1/2 कप 

चिरून घेतलेले काजू - 1/2 कप 

ब्रेडचे तुकडे - 1/4 कप 

लाल मिरची पावडर - 1 टीस्पून 

गरम मसाला - 1 टीस्पून 

हिरवी मिरची - 2 

कोथिंबीर

साखर 

तेल - तळण्यासाठी 

मीठ - चवीनुसार

कृती

दही कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्या. यानंतर कढईत तेल टाकून त्यात कांदे तळून घ्या. तळलेले कांदे एका बाऊलमध्ये काढून ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये दही टाका आणि चांगले फेटून घ्या. दही फेटून झाल्यानंतर त्यात किसलेले पनीर, फ्राईड कांदा, ५ टेबलस्पून ब्रेड क्रम्स घाला आणि संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. 

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात काजूचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून मिक्स करा. यानंतर लाल तिखट,  गरम मसाला, चिमुटभर साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. 

मिश्रण आणि मसाले एकत्र मिक्स झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे टिक्की तयार करा. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घ्या. त्यात टिक्की चांगले कोट करून घ्या. आणि गरम तेलात तळून घ्या. अशा प्रकारे दही पनीर कबाब खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स