Join us

अशी बटाट्याची कोशिंबीर कधी खाल्लीच नसेल, पोटभर खा खमंग-स्वादिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 08:35 IST

make potato salad like this, it's delicious very easy recipe : ही सोपी रेसिपी एकदा नक्की करा. चवीला छान जरा वेगळी.

आपल्याकडे वेगवेगळ्या पदार्थांमध्येही उपप्रकार असतात. सगळेच चवीला छान असतात. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार रेसिपी करत असतात. भाजीचे अनेक प्रकार असतात अगदी पोळी-चपातीतही अनेक प्रकार असतात. ताटाच्या डाव्या बाजूला वाढायचे पदार्थ म्हणजेच तोंडी लावायला घ्यायचे पदार्थ ताटात असले की जेवायला मज्जाच येते. कोशिंबीर ही त्याच बाजूला असते. (make potato salad like this, it's delicious very easy recipe )कोशिंबीर अनेक प्रकारची केली जाते. काकडीची कोथिंबीर तर केली जातेच. गाजराची कोशिंबीर अगदीच खमंग लागते. इतरही अनेक प्रकार असतात. पण तुम्ही कधी बटाट्याची कोशिंबीर खाल्ली आहे का? उकडलेल्या बटाट्याची अशी कोथिंबीर एखाद्या दिवशी करायला काही हरकत नाही. पोळीसोबत खा किंवा भातासोबत चवीला फार छान लागते. तसेच एकदा बटाटे उकडून झाले की पुढे कोशिंबीर करायला मोजून पाच मिनिटे लागतात. पाहा किती सोपी रेसिपी आहे एकदा नक्की करुन पाहा. 

साहित्य बटाटा, कांदा, साखर, दही, लिंबाचा रस, मोहरी पूड, मिरी पूड, टोमॅटो, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर 

कृती १. बटाटे छान उकडून घ्यायचे. उकडून झाल्यावर गार करायचे आणि सोलून घ्यायचे. त्याचे बारीक तुकडे करा. कुसकरू नका फक्त चिरून घ्यायचे. कांदा घ्या सोला आणि मस्त बारीक चिरुन घ्या. कोथिंबीरीची ताजी जुडी घेऊन या. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. छान ताजे दही घ्यायचे व्यवस्थित फेटायचे. 

२. दह्यात लाल तिखट घाला आणि मीठ घाला मस्त फेटून घ्यायचे. मग थोडी साखर घालायची आणि दह्यात एकजीव होऊ द्यायची. त्यात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालायचे. थोडा वेळ झाकून ठेवायचे. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. चिरलेला टोमॅटो घालायचा. लिंबाचा रस पिळायचा. आणि मस्त फेटून घ्यायचे. 

३. तेल गरम करायचे आणि त्यात थोडी मोहरी पूड घालायची. जरा परतायची. मग कोशिंबीरीत घालायची. ढवळायचे आणि मग मिरी पूड घालायची. कोथिंबीर थोडा वेळ झाकून ठेवायची छान मुरली की खमंग कोशिंबीर खायला घ्यायची.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.