डायटींग करताना फार फिकट पदार्थ खावे लागतात. पण काही पदार्थ असे ही असतात ज्यांची चव एकदम छान असते. गोड पदार्थ खाऊ नयेत. असं असलं तरी काही गोड पदार्थ पौष्टिक आहारात गणले जातात. जसे की पिनटबटर आणि आलमंड स्प्रेड. "मस्तपैकी पिनटबटर स्प्रेड ब्रेडला किंवा पोळीला लावून खा." असं डायटिशियन सांगतात, तेव्हा कसला आनंद होतो ना. ज्यांना डायटींग करायचे नाही, अशांसाठीही पिनटबटर खाणं चांगलंच आहे. शरीरासाठी गरजेच्या अशा फॅट्सने पिनेटबचर परिपूर्ण असतं. वजन कमी करण्यासाठी पिनटबटर उपयुक्त असते.
तसेच आलमंड स्प्रेडही पौष्टीक आणि पोटभरीचे असते. बाजारात आलमंड स्प्रेड खूप महाग मिळते. एवढे जास्त पैसे देऊनसुद्धा साखरेने भरलेले आलमंड स्प्रेड मिळते. त्यात बदाम कमी आणि इतर गोड पदार्थ जास्त असतात. आता पिनटबटर व आलमंड स्प्रेड घरीच तयार करा. फार सोपे आहे.
१.पिनटबटर
साहित्य: (एक वाटी दाण्यांच्या प्रमाणानुसार)
शेंगदाणे, मीठ, मध, शेंगतेल, खजूर
कृती:
१. शेंगदाणे भाजून घ्या. त्याची साले काढून घ्या. मिक्सरमध्ये फिरवून एकदम बारीक करून घ्या.
२. आता त्यात अगदी थोडंस म्हणजेच अर्धा चमचा मीठ घाला. त्यात दोन चमचे मध घाला. तीन खजूर घाला. दोन चमचे शेंगतेल घाला.
३. सगळ्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
२. आलमंड स्प्रेड
साहित्य:
बदाम, खायचे खोबरेल तेल, मीठ, मध
कृती:
१.बदाम मस्त परतून घ्या. गार झाले की मिक्सरमधून फिरवून घ्या. तेल सुटेपर्यंत फिरवा.
२.आता त्यात चिमटीभर मीठ घाला. दोन- तीन चमचे मध घाला. एक चमचा खोबरेल तेल घाला. सगळ्याची पेस्ट करून घ्या.
३. हवा बंद डब्यात नीट साठवून ठेवा.
गोड पदार्थात मीठ कशाला घालायचे? म्हणून मीठ घातले नाही असं करू नका. मीठामुळे स्प्रेड जास्त काळ टिकतात. दोन्ही स्प्रेड महिनाभर आरामात टिकतात. चवीला तर खुपच भारी लागतात.