Join us

भेळपुरीवाल्याकडे मिळते अगदी तशीच पापडी घरी करणे म्हणजे काही मिनिटांचे काम, पाहा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 16:04 IST

make papdi at home, easy recipes, salty - spicy and crispy papdi recipe : घरीच करा विकतपेक्षा मस्त पापडी.

चाटसाठी वापरली जाणारी पापडी घरच्या घरी सहज बनवता येते आणि ती खुसखुशीत, स्वादिष्ट लागते. घरची पापडी नेहमी ताजी, स्वच्छतेने बनवलेली असते आणि तिची चव खास असते. चाट तयार करताना त्यासाठी ही पापडी वापरली जाते. बटाटा पुरीसाठी वापरता येते. मात्र फक्त पापडी चहासोबतही एकदम मस्त लागते. (make papdi at home, easy recipes, salty - spicy and crispy papdi recipe  )फार चविष्ट असा हा पदार्थ आहे. विकत तर तुम्ही नक्कीच आणत असाल. मात्र ही पुरी घरी करणे फार सोपे आहे. शिवाय एकदा केली की महिनाभर आरामात टिकते. छान कुरकुरीत राहते. हलक्या भुकेसाठी, पाहुणचारासाठी आणि स्नॅक्ससाठी म्हणूनही ही पापडी उत्तम पर्याय ठरते. एकदा नक्की करुन पाहा. करायला अगदी सोपी आहे. 

साहित्य मैदा, जिरं, तेल, पाणी, लाल तिखट, मीठ, ओवा 

कृती१. दोन कप मैदा घ्यायचा. एका परातीत किंवा खोलगट भांड्यात घ्या. त्यात चमचाभर जिरं घाला. त्यात चमचाभर ओवाही घाला. नंतर त्यात चवी पुरते मीठ घाला आणि मिक्स करुन घ्या. सगळे पदार्थ छान एकजीव केल्यावर त्यात गरम तेल घाला. दोन चमचे तेल घाला. पीठ छान मिक्स करुन घ्या. 

२. हळूहळू थोडंथोडं पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. छान सैलसर पीठ मळा. अगदीच सैल नको थोडं घट्ट राहू द्या. पीठ मस्त मळून घ्या, नंतर जरा झाकून ठेवा. थोड्या वेळाने त्याच्या मध्यम आकाराच्या पोळ्या लाटा आणि मग लहान झाकणाने गोल पाडून घ्या किंवा पुरीसारखे लाटून घ्यायचे. एका कढईत तेल तापवा आणि त्यात त्या पुऱ्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. 

३. सगळ्या पुऱ्या तळून झाल्यावर त्यांना लाल तिखट लावा आणि एकजीव करुन घ्या. चवीला एकदम मस्त लागतात. नक्की करुन पाहा. पापडीचे पीठ मळताना त्यात काळीमिरी घालता येते. तसेच कसुरी मेथी घालू शकता. इतरही काही पदार्थ घालता येतात. चवीला आणखी छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.