Join us

मुंगलेट करा झटपट, मुले भाज्या खातील पोटभर! पाहा पौष्टिक चमचमीत पदार्थ - सुट्टी स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 14:20 IST

Make Munglet in no time Check out this nutritious and delicious dish : मस्त सोपी रेसिपी. लहान मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही.

मूग डाळे पौष्टिक मूंगलेट मुलांच्या डब्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदीच मस्त पदार्थ आहे. (Make Munglet in no time Check out this nutritious and delicious dish )पाहा अगदी सोपी रेसिपी.

साहित्य  मूग डाळ, पाणी, हिरवी मिरची, आलं, जिरे, मीठ, लाल तिखट, हळद, हिंग, गाजर, कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची, तांदळाचे पीठ, तूप, बेकिंग सोडा, काळी मिरी, मोहरी

कृती  १. पिवळी मूग डाळ भिजवून घ्या.(Make Munglet in no time Check out this nutritious and delicious dish ) रात्रभर भिजत ठेवा. रात्रभर नाही तर किमान दोन ते तीन तास तरी भिजवाच. भिजलेली मूग डाळ एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यामध्ये आल्याचा तुकडा घाला. हिरवी मिरची घाला तसेच त्यामध्ये मीठ, जिरे आणि थोडेसे पाणी घाला. मिश्रण अति पातळ करायचे नाही, जरा घट्ट ठेवा. एकदम मस्त मऊ अशी पेस्ट करून घ्या.

२. कांदा छान बारीक चिरून घ्या. गाजराची सालं काढा आणि गाजरही बारीक चिरून घ्या. सिमला मिरचीचे बारीक तुकडे करा. हिरव्या मिरचीचेही अगदी बारीक तुकडे करा.

३. मूग डाळीच्या मिश्रणामध्ये कांदा, गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सिमला मिरची घाला आणि सगळ्या भाज्या छान मिक्स करून घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ अगदी थोडं घाला. त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला. हिंग हवेच, अगदी चिमटीभर घ्यायचे. छान चवीसाठी काळी मिरी पूड घ्या. तसेच लाल तिखट घ्या. सगळे पदार्थ छान एकजीव करा. ढवळताना बेकिंग सोडा फसफसेल. त्याचे फसफसणे कमी झाल्यावर बॅटर जरा वेळ झाकून ठेवा.

४. एक पसरट व खोलगट असा पॅन घ्या. त्या पॅनमध्ये चमचाभर तूप घालायचे. तूप जरा तडतडले की त्यामध्ये मोहरी घाला. हिंग घाला आणि जरा तडतडू द्या. गॅस मंदच ठेवायचा. त्यावर मुगाच्या सारणाचा जाडसर लेअर लावा. पातळ नाही, जाड पॅन भरून गोलाकार आकारात जाडसर मूंगलेट लावायचे.

५. त्यावर झाकण ठेवा. किमान सात मिनिटे तरी मंद आचेवर ते शिजू द्या. नंतर एकदा उलटा आणि दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्या. वरची बाजू छान कुरकुरीत होते, आतमध्ये मस्त मऊ असे  हे मूंगलेट दोन्ही बाजू शिजल्यावर ताटामध्ये काढून घ्या. आवडत्या चटणी किंवा सॉससोबत खा.

टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजना