Join us

हिवाळ्यात ताज्या मटारचा करा मस्त खुसखुशीत मटार पराठा, खाऊन सगळे होतील खुश! सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 15:29 IST

make matar paratha at home : मटार करंजी बनवून झाली? आता छान मटार पराठा बनवा.

मस्तपैकी थंडी पडायला सुरूवात झाली असून, आता बाजारात हिवाळी भाज्या मिळायला लागल्या आहेत.(make matar paratha at home) हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात छान असे ताजे मटार मिळतात. थंडीत आपण मटारांपासून अनेकविध पदार्थं बनवतो. असाच एक सोपा आणि चविष्ट पदार्थं म्हणजे मटार पराठा. मटार सोलायला फार कंटाळा आला, तरी एकदा असा मटार पराठा बनवा आणि खाऊन बघा चव तर इतकी सुंदर असते की, पुन्हा-पुन्हा बनवाल.(make matar paratha at home) मटार फक्त चविष्ट नाही तर, पौष्टिक पण  असतात. मटारांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपुर असते. मटार जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असते. मटारांमध्ये 'झींक' बरोबर जीवनसत्त्व 'सी' व 'ई' असते. यात खनिजेदेखील असतात.(make matar paratha at home)

मटार पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य -मटार, लसुण, मिरची, कांदा, आलं, तांदळाचे पिठ, बेसन, गव्हाचे पिठ, ओवा, जिरे, मसाले, तूप, मीठ, तेल

कृती -  -   कढईमध्ये २ चमचे तेल घाला. तेल थोडे तापल्यावर त्यात जिरे घाला आणि मस्त तडतडू द्या. -   जिरं तडतडल्यावर त्यात लसूण,मिरची आणि आलं थोडं ठेचुन घाला. पूर्ण पेस्ट करायची गरज नाही. लसणीचे प्रमाण जरा जास्त घ्या म्हणजे लसणाची चव लागेल. सर्व पदार्थ         छान परतून घ्या. -   त्यात मटार घालून ते शिजेपर्यंत परता. साधारण हे सर्व मिश्रण १० मिनिटांमध्ये छान खमंग परतले जाईल . चमच्याने मटारांचा लगदा करत राहा. जेणे करून पराठा लाटताना      दाणे बाहेर येणार नाहीत. आणि पराठा चिकटणार नाही.  (make matar paratha at home) - आता हे मिश्रण पसरवून ठेवा आणि गार होऊ द्या. मिश्रण गार झाल्यावर त्यात पाणी न घालता ते जाडसर वाटुन घ्या. पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या. - आता कढईत थोडे तेल घ्या. त्यात  बारीक चिरुन कांदा घाला. मिश्रणाच्या निम्मं कांद्याचं प्रमाण ठेवा. कांदा गुलाबी होईपर्यंत खमंग परता. -  कांदा परतुन झाल्यावर त्यात मटाराचे गार झालेले मिश्रण घाला. तुम्हाला आवडणारे व उपलब्ध असलेले मसाले घाला. शेवटी चवीनुसार मीठ घाला . सर्व एकजीव होईपर्यंत          ढवळत राहा.(make matar paratha at home)-  मिश्रण गार करत ठेवा आणि  एकीकडे पिठं मळून घ्या.

-  गव्हाचे पिठ गरजेनुसार घ्या. मात्र बेसन ४ चमचेच घाला. तांदळाचे पिठ ६ चमचे घाला. बेसन चवी पुरते आणि तांदळाचे पिठ पराठे खुसखुशीत होण्यापूरतेच घाला. -  मळलेल्या पिठाचे आता गोळे करून घ्या . त्यात सारण भरा आणि मिश्रण बाहेर येणार नाही याची काळजी घेत लाटुन घ्या. पिठीचा वापर करा.- छान तुपावर पराठे खमंग           परतून घ्या. तूप नसल्यास तेल वापरू शकता पण तुपावर परतलेले पराठे अधिक चविष्ट लागतात.(make matar paratha at home)

लहान मुलांना चमचमीत खायला फार आवडते. मग त्यांना तळणीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाऊ घालण्यापेक्षा असे पदार्थ खायला द्या.

टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहारकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.