Lokmat Sakhi >Food > दीदी, एक कालाखट्टा देना! असं म्हणतील आता घरचेच कारण घरीच खा मनसोक्त कालाखट्टा, सोपी रेसिपी

दीदी, एक कालाखट्टा देना! असं म्हणतील आता घरचेच कारण घरीच खा मनसोक्त कालाखट्टा, सोपी रेसिपी

make kalakhatta syrup at home, easy recipe : जांभळाचा कालाखट्टा आता घरीच करा. पाहा सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 16:33 IST2025-05-08T16:33:04+5:302025-05-08T16:33:53+5:30

make kalakhatta syrup at home, easy recipe : जांभळाचा कालाखट्टा आता घरीच करा. पाहा सोपी रेसिपी.

make kalakhatta syrup at home, easy recipe | दीदी, एक कालाखट्टा देना! असं म्हणतील आता घरचेच कारण घरीच खा मनसोक्त कालाखट्टा, सोपी रेसिपी

दीदी, एक कालाखट्टा देना! असं म्हणतील आता घरचेच कारण घरीच खा मनसोक्त कालाखट्टा, सोपी रेसिपी

लहानपणी शाळेच्या बाहेर गोळेवाल्याची गाडी असायची. त्याच्याकडे कालाखट्टा सरबत आणि गोळा मिळायचा. (make kalakhatta syrup at home, easy recipe)चवीला अगदी मस्त असायचा. जीभ मस्त जांभळी व्हायची. घरी अगदी तसाच कालाखट्टा करता येतो. रेसिपीही अगदी सोपी आहे. आता बाजारात ताजी जांभळं मिळायला लागतील.(make kalakhatta syrup at home, easy recipe) एकदा ही रेसिपी नक्की करुन पाहा. 


अर्क करण्यासाठी साहित्य
जांभूळ, पाणी, काळे मीठ, जिरं पूड, लिंबू, आलं, साखर

कृती
१. छान ताजे जांभूळ घ्या. टवटवीत मोठे फळ घ्यायचे. स्वच्छ धुवा आणि मग त्याच्या बिया काढून घ्या. एका कढईत पाणी गरम करा. पाणी जरा उकळल्यावर त्यात काळे मीठ घालायचे. तसेच जिरे पूड घाला. आल्याचे तुकडे घाला. आलं जास्त वापरू नका चवी पुरतेच घ्या. 

२. पाण्यात जांभूळ घाला आणि उकळून घ्या. पाण्याचा रंग जांभळा होऊ द्या. गर सगळा विरघळेल आणि सालं शिल्लक राहतील. सगळे एकजीव झाल्यावर त्यात साखर घालायची. चांगली वाटीभर साखर घाला आणि मग ढवळा. जरा वेळ झाकून ठेवा. मस्त उकळी येऊ द्या. 

३. मिश्रण जरा घट्ट झालेले दिसेल. साखर विरघळली की  त्यात एक लिंबू पिळा आणि गॅस बंद करुन टाका.

सरबतासाठी साहित्य
पाणी, पुदिना, मीठ, लिंबाचा रस, बर्फ, जिरे पूड

कृती
१. साधे सरबत जसे करता अगदी तसेच करायचे. एका ग्लासमध्ये सिरप घ्या. त्यात पाणी ओता मग बर्फ घाला. मिश्रण छान ढवळून घ्या. मग थोडा लिंबाचा रस घाला. 

२. पुदिन्याची पाने चुरा किंवा ठेचा मग सरबतात घाला. थोडी जिरे पूड घाला. तसेच मीठ घाला आणि गारेगार प्या.    

हाच रस वापरुन बर्फाचा गोळाही तयार करता येतो. त्यासाठी बर्फ किसून घ्या आणि मग एका ग्लासमध्ये टाका त्यात एक काडी किंवा चमचा अडकवा. घरी गोळेवाल्यासारखी काडी नसते त्यामुळे चमचा वापरायचा. उलटा चमचा गोळ्यात टाकायचा. मग ग्लास उलटा करुन गोळा काढा आणि त्यावर कालाखट्टा सरबत ओता.         

Web Title: make kalakhatta syrup at home, easy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.