Lokmat Sakhi >Food > गारेगार जलजीरा लिंबू मारके! अगदी ५ मिनिटांत करा घरीच जलजीरा, स्पेशल मसाला रेसिपी

गारेगार जलजीरा लिंबू मारके! अगदी ५ मिनिटांत करा घरीच जलजीरा, स्पेशल मसाला रेसिपी

Make Jaljeera at home in just 5 minutes, special masala recipe : उन्हाळ्यासाठी खास रेसिपी. पाहा जलजीरा मसाला घरी कसा कराल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 14:06 IST2025-05-06T14:05:53+5:302025-05-06T14:06:40+5:30

Make Jaljeera at home in just 5 minutes, special masala recipe : उन्हाळ्यासाठी खास रेसिपी. पाहा जलजीरा मसाला घरी कसा कराल.

Make Jaljeera at home in just 5 minutes, special masala recipe | गारेगार जलजीरा लिंबू मारके! अगदी ५ मिनिटांत करा घरीच जलजीरा, स्पेशल मसाला रेसिपी

गारेगार जलजीरा लिंबू मारके! अगदी ५ मिनिटांत करा घरीच जलजीरा, स्पेशल मसाला रेसिपी

उन्हाळ्यात काही ना काही गार पित राहावे. गार म्हणजे फक्त बर्फ घातलेले नाही तर जे पदार्थ गार प्रकृतीचे आहेत असे पदार्थ खा. त्या पदार्थांमुळे पोटाला थंडावा मिळेल.(Make Jaljeera at home in just 5 minutes, special masala recipe) विकतचे सोडायुक्त पेय राहू दे, घरीच छान गारेगार ड्रिंक्स करा आणि प्या. जलजीरा लहानपणी फार प्यायला असेल. घरी त्याची पूड करणेही अगदीच सोपे आहे. पचनासाठी हे पेय अगदी मस्त असते तसेच चवीलाही छान लागते. पाहा साधी सोपी रेसिपी.

साहित्य 
जिरे, काळी मिरी पूड, आमचूर, काळे मीठ, लाल तिखट, सुंठ पूड, हिंग, मीठ, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, गूळ, पाणी, बुंदी, लिंबू 

कृती
१. जलजीरा पूड घरी करायला अगदीच सोपी असते. (Make Jaljeera at home in just 5 minutes, special masala recipe)एकदा करुन ठेवा आणि महिनोंमहिने वापरा. खराब होत नाही. त्यासाठी एका पॅनमध्ये जिरे घ्या. तेल पाणी काहीही वापरु नका. जिरं छान परतून घ्या. जिऱ्याचा छान खमंग वास सुटल्यावर त्या गॅसबंद करा.

२. मिक्सरच्या भांड्यात जिरं घ्या. त्यात काळी मिरी पूड घाला. तसेच आमचूर घाला. लाल तिखट घाला. अगदी थोडी सुंठ पूड घाला. हिंग घाला. काळे मीठ घाला. सगळे मसाले चमचाभरच वापरायचे मात्र आमचूर जास्त घ्या. तसेच सुंठ काळी मिरी पूड जरा बेतानेच घ्यायची. जिरा मसाला जास्त तिखट होणार नाही याची काळजी घ्या. 

३. मिक्सरमध्ये मसाले वाटून घ्या. छान बारीक पूड करुन घ्यायची. पूड झाल्यावर एका हवाबंद डब्यात काढून घ्या. बरेच दिवस टिकेल. 

४. मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजी कोथिंबीर घ्या. तसेच त्यात मस्त ताजा पुदिना घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आल्याचा तुकडा घाला. थोडा गूळ घ्या. त्यात वाटले जाण्यापुरते पाणी घाला. त्याची छान चटणी पेस्ट करुन घ्या. 

५. एका ग्लासात बर्फ घ्या. त्यात पुदिना व कोथिंबीरीची केलेली चटणी घाला. तसेच जलजीरा मसाला घाला. चमचाभर पुरेसा होते. हा मसाला चवीला फार स्ट्रँग लागतो. त्यानुसारच वापरा. जास्त झाला तर चुरचुरेल. 

६. ग्लासमध्ये एक लिंबू पिळा. सगळं मिक्स करा आणि मग त्यात पाणी ओता. पाणी व मसाले एकजीव करुन घ्या.  त्यात वरतून पिवळी बुंदी टाका. गारेगार प्या.    

Web Title: Make Jaljeera at home in just 5 minutes, special masala recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.