Join us

अनुष्का शर्माला आवडणाऱ्या बदाम मिल्कचे करा ‘हॉट चॉकलेट’; असं भारी ड्रिंक-बिनसारखेची खास चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 17:20 IST

make 'hot chocolate'; this heavy drink has a special taste of almonds : असे छान बदामाच्या दुधाचे हॉट चॉकलेट लहान मुलांना नक्की आवडेल.

बदामाचे दूध पौष्टिक असते. बदामाच्या दुधाचे हे असे गरमागरम पेय एकदा करुन पाहा पुन्हा नक्की कराल. ( make 'hot chocolate'; this heavy drink has a special taste of almonds)साखर न वापरता तसेच इतरही कोणतेही जास्तीचे पदार्थ न घेते छान हॉट चॉकलेट कराणे अगदीच सोपे आहे. संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याआधी असे पेय प्या. विकतचे चॉकलेट ड्रिंक पिण्यापेक्षा असे पेय पिणे अतिउत्तम ठरेल. 

साहित्यबदाम, काजू, दालचिनी, पाणी, कोको पावडर, गूळ 

कृती१. हॉट चॉकलेट करण्यासाठी घरी तयार केलेले बदामाचे दूध वापरायचे. त्यासाठी रात्रभर बदाम भिजत घाला.  ( make 'hot chocolate'; this heavy drink has a special taste of almonds)तसेच थोडे काजूही भिजवायचे. बदामाचे दूध चवीला छान असते. तसेच पौष्टिकही असते. रात्रभर भिजवलेले बदाम एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात भिजवलेले काजूही घाला. बदाम जरा बारा - तेरा घेतले तर काजू ५ घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घाला आणि व्यवस्थित वाटून घ्या. त्यात आणखी वाटीभर पाणी घाला आणि पुन्हा वाटून घ्या. 

२. एका कॉटनचा स्वच्छ फडका घ्या. तो एका खोलगट भांड्यावर ठेवा. त्यात हळूहळू मिश्रण ओता. नंतर फडक्याचे तोंड बंद करुन घ्या आणि छान पिळून घ्या. त्यात आणखी थोडे पाणी घाला आणि सगळा रस व्यवस्थित पिळून घ्या. चोथा खाऊ शकता. किंवा मग बाजूला करा. बदामाचे दूध तयार होईल. बदामाच्या दुधात थोडी कोको पावडर घाला आणि ढवळून घ्या. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. सगळं छान मिक्स करुन घ्या. 

३. गॅसवर बदामाचे दूध तापवत ठेवा. अगदी मंद आचेवर दूध तापवायचे. त्यात जरा उकळी येऊ द्या. सतत ढवळत राहा नाही तर त्यात थर जमा होतील. दूध जरा उकळल्यावर किसलेला गूळ घालायचा. गुळाची पावडर मिळते ती असेल तर आणखी उत्तम. पावडर चटकन विरघळते. गुळाला जरा वेळ लागतो. त्यात दालचिनीचा तुकडा घाला. दूध आटेपर्यंत उकळू द्या. मस्त उकळल्यावर चॉकलेटी रंगाचे दिसेल. मग कपात ओतून घ्या आणि आस्वाद घेत प्या.   

टॅग्स :अन्नआहार योजनापाककृती