Join us

अर्धा लिटर दूध-३ ब्रेड स्लाइज, थंडगार व्हॅनिला आईस्क्रीमची सोपी कृती; १५ मिनिटात आईस्क्रीम तयार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2024 15:03 IST

Make Homemade Vanilla Ice Cream in 15 Minutes : विकतचे कशाला? कन्डेंस मिल्कशिवायही थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम करता येते..

उन्हाळा सुरु होताच, सर्वत्र उन्हाच्या झळा बसू लागतात (Summer Special). अंगाची लाही-लाही होते. शिवाय या दिवसात काहीही मासालेदार खाण्याची इच्छा होत नाही. मुख्य म्हणजे आपण दोन घास कमी खातो, आणि थंड पदार्थांवर भर देतो. विविध प्रकारचे आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, विविध फळांचा रस पितो. पण लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आईस्क्रीम वर भर देतात. शिवाय चवीनेही खातात.

आईस्क्रीम खाल्ल्याने मन आणि शरीर दोन्ही थंड होते (Vanilla Ice Cream). पण  काही वेळेला विकतचे आईस्क्रीम खाल्ल्याने घसा खवखवतो किंवा आपण आजारी पडतो (Homemade Ice Cream). विकतचे आईस्क्रीम आणण्यापेक्षा, आपण घरातच दूध आणि ब्रेडचा वापर करून व्हॅनिला आईस्क्रीम तयार करू शकता. घरात थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम कसे तयार करायचे? पाहा(Make Homemade Vanilla Ice Cream in 15 Minutes).

व्हॅनिला आईस्क्रीम करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

ब्रेड

साखर

कपभर रव्याचे करा ५० पळी पापड, तेलात फुलतात दुप्पट; करायला सोपे-टिकतात भरपूर

क्रीम

व्हॅनिला एसेन्स

कृती

सर्वप्रथम, गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात अर्धा लिटर दूध घाला. दुधाला उकळी फुटल्यानंतर त्यात ३ ब्रेडचे स्लाईज घाला, आणि मिक्स करा. दुधात ब्रेड स्लाइज मिक्स केल्यानंतर त्यात अर्धा कप साखर घालून ढवळत राहा. जोपर्यंत दुधाला घट्टपणा येत नाही, तोपर्यंत ढवळत राहा, आणि शेवटी गॅस बंद करा.

डाळ-तांदूळ कशाला? कपभर सोया चंक्स घ्या अन् वेट लॉस डोसा करा! क्रिस्पी डोसा-१० मिनिटात

साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये एक कप क्रीम, अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा मिक्स करा. तयार क्रिमी आईस्क्रीम एका डब्यात काढून घ्या, व सेट करण्यासाठी फ्रिझरमध्ये ठेवा. अशा प्रकारे घरगुती व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :समर स्पेशलअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स