Join us

भजी तर आवडतात पण बेसन पचत नाही? करा ज्वारीची कुरकुरीत कांदा भजी, खा बिंधास्त पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 17:33 IST

Make Homemade Nutritious Jowar Pakoda, Note Recipe घरात बेसन संपलं असेल आणि भजी खायची हूक्की आली तर करा ही पौष्टिक भजी

कुरकुरीत भजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. भजी खाण्यासाठी काळवेळ नसतो. भजी अनेक पदार्थांचा वापर करून बनवली जाते. कांदा भजी, मिरची भजी, बटाटा भजी, पालक भजी. भजी बनण्यासाठी बेसन पिठाचा वापर करण्यात येतो. बेसनात अनेक जण तांदुळाच्या पिठाचा देखील वापर करतात. ज्यामुळे भजी अधिक चविष्ट व कुरकुरीत बनते. बहुतांश वेळा घरात बेसन पीठ उपलब्ध नसते. भजी खाण्याची तीव्र इच्छा झाल्यावर काय करावे हे सुचत नाही.

अशा परिस्थितीत बेसन पिठाच्या जागी ज्वारीच्या पिठाचा वापर करून पाहा. ज्वारीमध्ये असलेल्या फायबरमुळे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही भजी खूप उपयुक्त आहे. ही भजी चवीला खूप उत्कृष्ट व कमी तेलात तयार होते. चला तर मग ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत भजीची कृती पाहूयात(Make Homemade Nutritious Jowar Pakoda, Note Recipe).

ज्वारीच्या पिठाची कांदा भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य 

३ मोठे कांदे 

ओवा 

जिरे पूड 

मीठ

ज्वारीचे पीठ 

कोर्नफ्लोर 

हळद 

बारीक चिरलेली कोथिंबीर 

दह्यात मीठ घालून खावे की साखर? तज्ज्ञ सांगतात काय फायद्याचं - कशाने बिघडते तब्येत

हिरवी मिरचीची पेस्ट 

बेकिंग सोडा 

तेल 

पाणी 

अशा पद्धतीने बनवा ज्वारीच्या पिठाची कांदा भजी

सर्वप्रथम, कांद्याचे उभे काप करून घ्या, कांदा चिरून झाल्यानंतर बाऊलमध्ये घ्या व त्यात मीठ घालून मिक्स करून ठेवा. कांद्याला पाणी सुटल्यानंतर त्यात तीन चमचे ज्वारीचे पीठ, एक चमचा कोर्नफ्लोर, अर्धा चमचा हळद, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा बेकिंग सोडा, जिरे पूड घालून मिश्रण चांगले मिक्स करा. कांद्याला पाणी सुटते, त्यामुळे पाणी आवश्यकतेनुसार घालून मिश्रण तयार करा. आपल्याला हवं असल्यास त्यात डाळीच्या पिठाचे देखील वापर करू शकता.

पांढरेशुभ्र बटाटा वेफर्स करण्याची सोपी झ्टपट पद्धत, वर्षभर टिकतील वेफर्स

दुसरीकडे गॅसवर कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात हे भजी मिडीयम फ्लेमवर लालसर होईपर्यंत तळून घ्या. जेणेकरून ते कुरकुरीत होतील. अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत कांदा भजी खाण्यासाठी रेडी. कांदा ऐवजी आपण बटाट्याचा किस देखील वापरू शकता.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स