Lokmat Sakhi >Food > विकतपेक्षा भारी फ्रेंच फ्राईज घरीच करा, पाहा सोपी रेसिपी.. लहान मुलांसाठी तर मेजवानीच..

विकतपेक्षा भारी फ्रेंच फ्राईज घरीच करा, पाहा सोपी रेसिपी.. लहान मुलांसाठी तर मेजवानीच..

Make French fries at home see the easy recipe : कॅफेपेक्षा मस्त फ्राईज आता घरीच करा. पाहा अगदी सोप्या टिप्स व रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 16:10 IST2025-04-29T16:09:45+5:302025-04-29T16:10:26+5:30

Make French fries at home see the easy recipe : कॅफेपेक्षा मस्त फ्राईज आता घरीच करा. पाहा अगदी सोप्या टिप्स व रेसिपी.

Make French fries at home see the easy recipe | विकतपेक्षा भारी फ्रेंच फ्राईज घरीच करा, पाहा सोपी रेसिपी.. लहान मुलांसाठी तर मेजवानीच..

विकतपेक्षा भारी फ्रेंच फ्राईज घरीच करा, पाहा सोपी रेसिपी.. लहान मुलांसाठी तर मेजवानीच..

बाहेर काही पिझ्झा बर्गर खायला गेल्यावर एक साईड डिश ठरलेली असते. ती म्हणजे फ्रेंच फ्राईज. फक्त तळलेला बटाटा तर असतो. (Make French fries at home see the easy recipe)मग घरी केलेला विकतसारखा का होत नाही? कारण विकतचे फ्राईज जरा वेगळ्या पद्धतीने केले जातात. ही रेसिपी पाहा. लहान मुलांना तर घरी केलेत यावर विश्वासच बसणार नाही.(Make French fries at home see the easy recipe)

साहित्य  
बटाटा, विनेगर, मीठ, पाणी, तेल, कॉर्नफ्लावर

कृती  
१. आकाराला मोठे असलेले बटाटे घ्या. (Make French fries at home see the easy recipe)बटाट्याची सालं सोलून घ्या. बटाटा व्यवस्थित धुवा. बटाट्याचे लांब-लांब जरा जाडसर काप करून घ्या. अति पातळ करू नका आणि जास्त जाडही ठेऊ नका. लांब व्यवस्थित मध्यम आकाराचे काप करा.

२. एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवा. पाणी उकळल्यावर त्यामध्ये चमचाभर तेल घाला. तसेच विनेगर घाला. त्यामध्ये कापलेले बटाट्याचे तुकडे टाका. मोजून पाच मिनिटांसाठी ते उकळू द्या. ढवळू नका. त्याला हातच लाऊ नका. म्हणजे बटाट्याचा लगदा होणार नाही.

३. पाच मिनिटांनी बटाटा आणि पाणी वेगळे करून घ्या. पाणी निथळवल्यानंतर फ्राईजवर राहिलेले पाणी जावे म्हणून आणि बटाटा पूर्ण सुका व्हावा यासाठी एका सुक्या फडक्यावर टाका. वरतून अलगद हाताने कॉटनचा सुका फडका फिरवा आणि पाणी काढून टाका.

४. थोड्यावेळाने एका खोलगट मोठ्या भांड्यात फ्राईज घ्या. त्यामध्ये थोडे कॉर्नफ्लावर घाला. मीठ घालू नका. मिठामुळे फ्राईज कुरकुरीत होत नाहीत. मऊ होतात, त्यामुळे तळण्याआधी मीठ लाऊ नका.

५. कढईमध्ये तेल तापत ठेवा. तेल व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये एक एक करून बटाट्याचे काप सोडा. गॅस फुल ठेऊ नका. मध्यम ठेवा. मोजून दोन मिनिटांमध्ये ते फ्राईज काढून घ्या. पूर्ण गार होऊ द्या. गार झाल्यावर पुन्हा तळा आणि कुरकुरीत करून घ्या.

६. एका भांड्यात तळलेले सगळे फ्राईज काढा, त्यावर मीठ टाका, व्यवस्थित मिक्स करा आणि मग गरमागरम खा.

Web Title: Make French fries at home see the easy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.