Lokmat Sakhi >Food > घरी करा मस्त पौष्टिक पांढरा ढोकळा, आंबवणे - भिजवणे काही नाही, फक्त काही मिनिटांचे काम

घरी करा मस्त पौष्टिक पांढरा ढोकळा, आंबवणे - भिजवणे काही नाही, फक्त काही मिनिटांचे काम

Make delicious and nutritious white dhokla at home, no fermentation or soaking, just a few minutes of work : झटपट पांढरा ढोकळा करायची अगदी सोपी पद्धत. पौष्टिकही आणि चवीला अगदी झक्कास!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 09:56 IST2025-05-29T09:54:39+5:302025-05-29T09:56:21+5:30

Make delicious and nutritious white dhokla at home, no fermentation or soaking, just a few minutes of work : झटपट पांढरा ढोकळा करायची अगदी सोपी पद्धत. पौष्टिकही आणि चवीला अगदी झक्कास!!

Make delicious and nutritious white dhokla at home, no fermentation or soaking, just a few minutes of work | घरी करा मस्त पौष्टिक पांढरा ढोकळा, आंबवणे - भिजवणे काही नाही, फक्त काही मिनिटांचे काम

घरी करा मस्त पौष्टिक पांढरा ढोकळा, आंबवणे - भिजवणे काही नाही, फक्त काही मिनिटांचे काम

पांढरा ढोकळा आवडतो की पिवळा ढोकळा? तसा कृतीत काही फार फरक नसतो. मात्र चवीला दोन्ही वेगळे लागतात. पांढरा तसा शक्यतो आपण विकतच आणतो. मात्र पांढरा ढोकळा घरी करायला अगदी सोपा आहे. झटपट करताय येतो. पाहा अगदी सोपी रेसिपी.  

साहित्य 
रवा, दही, पाणी, मीठ, इनो, तेल, मोहरी, कडीपत्ता, हिंग, कडीपत्ता, हिरवी मिरची, काळी मिरी पूड, कोथिंबीर  

कृती
१. एका पातेल्यात रवा घ्यायचा. त्यात दही घालायचे. दही जरा आंबट मिळाले तर चव जास्त छान लागेल. त्यात थोडे पाणी घालायचे आणि मग ते मिश्रण छान ढवळून घ्यायचे. एकजीव करायचे त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे. 

२. नंतर त्यात थोडे इनो घालायचे. तसेच आणखी थोडे पाणी घालून मस्त ढवळायचे. अति पातळ करायचे नाही. मध्यमच ठेवायचे. पीठ तयार झाल्यावर ढोकळा पात्र असेल तर ते वापरा आणि नसेल तर कुकरही वापरु शकता. 

३. मात्र कुकरपेक्षा या पद्धतीने ढोकळा जास्त छान स्टीम होते. एका कढईमध्ये पाणी तापवायचे. त्यावर अख्खी राहिल अशी खोलगट ताटली ठेवायची. त्या ताटलीत ढोकळ्याचे मिश्रण ओतायचे. आणि झाकून ठेवायचे. १५ मिनिटांत ढोकळा तयार होतो. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचा तुम्ही करा. सगळ्या पद्धती चांगल्याच आहेत. ढोकळा लावताना त्यावर थोडे लाल तिखट भुरभुरायचे. तसेच ताटलीला तेल लावायचे. मगच त्यात मिश्रण ओतायचे. व्यवस्थित वाफवायचे. सारखे उघडून पाहू नका. वाफ निघून जाते. 

४. एका फोडणी पात्रात तेल घ्यायचे. तेल जरा कोमट झाले की त्यात चमचाभर हिंग घालायचे. मग त्यात लांब चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. त्यात चमचाभर मोहरी घालायची. कोथिंबीर घालायची. कोथिंबीर परतली नाही तरी चालेल फक्त बारीक चिरायची आणि ढोकळ्यावर घालायची. तयार फोडणीही ढोकळ्यावर ओतायची. वरतून काळी मिरी पूड भुरभुरायची. ढोकळ्याच्या चवीला फोडणीमुळे जास्त मज्जा येते.

Web Title: Make delicious and nutritious white dhokla at home, no fermentation or soaking, just a few minutes of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.