कोणताही सण असो उपासाला काय करायचे हा प्रश्न घरोघरी असतोच. तसे महाराष्ट्रात उपासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी राजा असतो. कोणताही उपास असला की आदल्या रात्री साबुदाणा भिजवला जातोच. मात्र नवरात्रीचा उपवास जरा जास्त दिवसांचा असतो. (Make delicious and crispy bhajis quickly on fasting days - A unique way of cooking, tasty recipes )तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे काहीतरी वेगळे खावेसे वाटते. अशा वेळी छान कुरकुरीत भजी खायला मिळाली तर किती भारी ना ? पण उपासाला भजी कशी चालेल ? उपासासाठी खास भजी करता येते. चवीालाही एकदम मस्त लागते. पाहा कशी करायची एकदम सोपी रेसिपी आहे. नऊ दिवसांत एकदा तरी नक्की करुन पाहा. तसेच तरही दिवशी चवीसाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी मस्त पदार्थ आहे. लहान मुलांना हा प्रकार नक्कीच आवडेल.
साहित्य
बटाटा, पाणी, तेल, हिरवी मिरची, साबुदाणा पीठ, वरीचे पीठ, मीठ
कृती
१. बटाटा सोलून घ्यायचा. स्वच्छ धुवायचा आणि नंतर एका परातीत थोडे पाणी घ्यायचे. त्यात किसणी ठेवा आणि मग बटाटा बारीक किसून घ्या. बटाट्याचा किस पाण्यातून दोन ते तीन वेळा काढायचा आणि मग घट्ट पिळून घ्यायचा. त्यातील पाणी काढून टाकायचे. व्यवस्थित पिळून एका खोलगट पातेल्यात घ्यायचा.
२. हिरव्या मिरचीची पेस्ट करायची. त्यासाठी हिरव्या मिरचीचे तुकडे करा आणि मग मिक्सरला वाटा किंवा ठेचून घ्या. हिरव्या मिरचीची पेस्ट बटाट्याच्या किसमध्ये घाला. तसेच त्यात साबुदाण्याचे पीठ घाला. त्यात थोडे वरीचे पीठ घाला. साबुदाण्याचे पीठ जेवढे घ्याल तेवढेच वरीचे पीठ घ्यायचे. दोन बटाट्यांना अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी वरीचे पीठ घ्यायचे. त्यानुसार प्रमाण ठरवा.
३. हाताने पीठ एकदम घट्ट मळायचे. त्यात अजिबात पाणी वगैरे घालायचे नाही. त्यात चवी पुरते मीठ घाला आणि मिश्रण एकजीव करुन घ्या. कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यातील दोन चमचे तेल पिठात घाला. पीठ छान मिक्स करुन घ्या. तेल तापल्यावर त्यात लहान लहान भजी तळून घ्या. जास्त मोठी भजी केली तर कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे लहान भजी तळा.
उपासाला सगळीकडे वेवेगळ्या प्रथा असतात. त्यामुळे जर तुम्ही उपासाला कोथिंबीर, जिरे असे पदार्थ खात असाल तर भजीच्या पिठाच बारीक चिरलेली कोथिंबीर नक्की घाला. चव एकदम मस्त लागते. तसेच जिरे किंवा जिरे पूड घालू शकता.