Join us

फक्त १० मिनिटांत करा कोको मिल्क! विकतच्या चॉकलेट शेकपेक्षाही भारी-थंडगार गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 19:43 IST

Make Cocoa Milk in Just 10 Minutes : उन्हाळ्यासाठी खास रेसिपी. कोको मिल्क म्हणा किंवा चॉकलेट मिल्कशेक चवीला एकदम मस्त.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चांगली फळे खावीत. तसेच ज्यूस प्यावे. मात्र कधीतरी काहीतरी वेगळे प्यावेसे वाटतेच. (Make Cocoa Milk in Just 10 Minutes! )फालूदा असेल किंवा बदामशेक आपण अगदी आवडीने पितो. वेगवेगळे शेक घरी करता येतात. जसे की अॅपलशेक, ड्रायफ्रुटशेक, मॅग्नोशेक इतरही अनेक प्रकार घरी करणे अगदीच सोपे आहे. चॉकलेट हा प्रकार अनेकांना फार आवडतो. हॉट चॉकलेट थंडीच्या दिवसांमध्ये प्यायला फार छान लागते. तसेच चॉकलेटचे विविध प्रकार घरी करता येतात. विकत घेऊन चॉकलेट शेक किंवा कोको मिल्क तर पितच असाल. मात्र विकतचे ना दूध चांगले असते ना चॉकलेट . (Make Cocoa Milk in Just 10 Minutes! )त्यामुळे घरीच कोकोमिल्क करता आले तर मज्जाच येईल. ते करणे अगदीच सोपे आहे पाहा किती सोपी रेसिपी आहे. 

साहित्यदूध, साखर, कॉर्नफ्लावर, डार्क चॉकलेट किंवा कोणतेही चॉकलेट, कोको पावडर, केळ, ओट्स 

कृती१. एका खोलगट पातेल्यामध्ये दूध तापवत ठेवा. दूध उकळल्यावर गॅस कमी करा आणि दूध जरा आटू द्या. दूध आटायला लागल्यावर त्यामध्ये साखर घाला. जर गोड चॉकलेट वापरणार असाल तर मग साखर कमी घाला. फक्त डार्क चॉकलेट वापरत असाल तर जरा जास्त साखर वापरा. 

२. साखर घातल्यावर दूध चांगले उकळू द्या. साखर पूर्ण विरघळू द्या. दूध मधेमधे ढवळा. साखर विरघळल्यावर त्यामध्ये कोको पावडर घाला आणि दूध उकळवून घ्या.त्यामध्ये डार्क चॉकलेटचा तुकडा टाका. चॉकलेट चांगले विरघळू द्या.  एका वाटीत थोडे साधे दूध घ्या. त्यामध्ये थोडे कॉर्नफ्लावर घाला आणि छान मिक्स करा. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. मिक्स झाल्यावर वाटीतील मिश्रण उकळत्या दुधामध्ये ओता आणि गॅस मंदच ठेवा. सतत ढवळत राहा दूध घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. ते छान गार करा.

३. दूध गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओट्स घ्या. त्यामध्ये एक केळ कुसकरून घाला. त्यामध्ये चॉकलेटचे मिश्रण टाका. अगदी मऊ आणि एकजीव होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा. मग त्यामध्ये बर्फ घालून प्या. किंवा मग फ्रिजमध्ये ठेऊन गार करुन घ्या.

टॅग्स :समर स्पेशलपाककृतीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.