Join us

दुधीचे साल आणि तीळ, करा झणझणीत पौष्टिक चटणी, भाताशी खा किंवा पोळीशी - झक्कास चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 12:07 IST

make a spicy nutritious chutney with Bottle Gourd peels and sesame seeds, a delicious taste : दुधीच्या सालाची अशी छान चटणी एकदा कराच. नक्की आवडेल.

आपल्या भारतीय पारंपारिक पदार्थांच्या रेसिपींमध्ये अन्न अजिबात वाया जाऊ दिले जात नाही. भाजीपाला, कोथिंबीर-पुदिन्याच्या काड्या, फळांची सालं तसेच भाज्यांची सालं वाया जाऊ नयेत यासाठी अनेक रेसिपी आहेत.(make a spicy nutritious chutney with Bottle Gourd peels and sesame seeds,  a delicious taste) या रेसिपी चवीलाही अगदी छान असतात. अशीच एक मस्त रेसिपी म्हणजे दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी. करायला अगदी सोपी आहे. दुधीच्या भाजीचा बेत असला की आता ही चटणीही नक्की करा. मस्त कुरकुरीत होते. सामग्रीही अगदी मोजकीच लागते.   

साहित्यदुधी भोपळा, पांढरे तीळ, तेल, कडीपत्ता, हिंग, हळद, हिरवी मिरची, लाल तिखट, जिरे, मीठ

कृती१. दुधी भोपळा स्वच्छ धुवायचा. लांब किसणी घ्यायची. म्हणजे काम पटकन होईल. किसणीवर दुधी भोपळ्याची फक्त सालं किसायची भोपळा(make a spicy nutritious chutney with Bottle Gourd peels and sesame seeds,  a delicious taste) भाजीसाठी किंवा खीरीसाठी वापरायचा. दुधी भोपळा सोलून सालं जर वाया घालवत असाल तर आता तसे करु नका. दुधीला भरपूर साल असते. चांगली जाडही असते. सालं किसून घेतल्यावर त्याचे पाणी काढायचे. म्हणजे चटणी ओली होणार नाही. 

२. एका कढईत दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे. तेल जरा कोमट झाल्यावर त्यात जिरे घालायचे. जिरे छान फुले की मग फोडणीत कडीपत्याची पाने घालायची. चमचाभर हिंग घालायचे. हिरव्या मिरचीचे लांब तुकडे करा किंवा अगदी बारीक तुकडे करा. या चटणीसाठी लांब तुकडे छान वाटतात. तिखट कितपत आवडते तेवढ्या मिरची घ्या. तेलात हिरवी मिरची छान परतायची. 

३. हिरवी मिरची घातल्यावर त्यात भरपूर पांढरे तीळ घालायचे. तीळ मस्त खमंग होईपर्यंत परतायचे. तीळांचा रंग जरा बदलायला लागला की त्यात दुधी भोपळ्याची किसलेली साल घालायची. छान परतून घ्यायचे. मग त्यात चमचाभर मीठ घालायचे. हळद घालायची. तसेच लाल तिखट घालायचे. सगळे पदार्थ व्यवस्थित ढवळायचे. सालं कुरकुरीत होईपर्यंत चटणी परतायची. झाकण ठेवायचे नाही. चटणीचा रंग लालसर झाला की गॅस बंद करायचा. चटणी गार झाल्यावर काढून घ्यायची.         

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती