Lokmat Sakhi >Food > आवडत्या भाज्या घालून करा पनीर-सोयाबिनचा चविष्ट पुलाव, झटपट करा आणि पोटभर खा

आवडत्या भाज्या घालून करा पनीर-सोयाबिनचा चविष्ट पुलाव, झटपट करा आणि पोटभर खा

Make a delicious paneer-soybean pulao with your favorite vegetables : जेवणात जर असा पुलाव मिळाला तर आणखी काय हवं. अगदी सोपी आणि स्वादीष्ट पुलाव रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 17:29 IST2025-05-19T17:25:51+5:302025-05-19T17:29:55+5:30

Make a delicious paneer-soybean pulao with your favorite vegetables : जेवणात जर असा पुलाव मिळाला तर आणखी काय हवं. अगदी सोपी आणि स्वादीष्ट पुलाव रेसिपी.

Make a delicious paneer-soybean pulao with your favorite vegetables | आवडत्या भाज्या घालून करा पनीर-सोयाबिनचा चविष्ट पुलाव, झटपट करा आणि पोटभर खा

आवडत्या भाज्या घालून करा पनीर-सोयाबिनचा चविष्ट पुलाव, झटपट करा आणि पोटभर खा

साधा पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर आता असा पनीर-सोयाबिनचा पुलाव करुन पाहा. (Make a delicious paneer-soybean pulao with your favorite vegetables)नक्की आवडेल. करायलाही सोपा आहे. 

साहित्य
पनीर, सोयाबिन, कांदा, सिमला मिरची, गाजर, फरसबी, फुलकोबी, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर, दही, लाल तिखट, हळद, मीठ, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, वेलची, हिंग, पाणी, तेल, तूप 

कृती
१. कांदा लांब लांब चिरुन घ्यायचा. पातळ काप करायचे. सिमला मिरचीही लांब लांब कापून घ्यायची. फरसबीही छान चिरुन घ्यायची. गाजराचे पातळ काप करायचे. (Make a delicious paneer-soybean pulao with your favorite vegetables)फुलकोबीचेही तुकडे करुन घ्यायचे. भाजीसाठी चिरता तसा चिरु नका मोठे तुकडे ठेवा. टोमॅटोही लांब-लांब चिरुन घ्यायचा. लसूण सोलून घ्यायचा आणि लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करुन घ्यायचे. कोथिंबीर छान बारीक चिरुन घ्यायची. आलं किसून घ्यायचे. तांदूळ धुवायचा आणि भिजवून ठेवायचा. 

२. सोयाबिन पाण्यात घालून उकळून घ्यायचे. छान मऊ करुन घ्यायचे. जास्त वेळ उकळवू नका नाही तर चुरा होतो. सोयाबिनचे पाणी काढा आणि जाळीवर टाकून ठेवा. पाणी निथळत राहू दे. पनीरचे लहान तुकडे करुन घ्यायचे. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्या. त्यावर थोडं लाल तिखट आणि थोडी हळद टाका. त्यावर पनीरचे तुकडे व सोयाबिन परतून घ्या. छान लाल पिवळे होईपर्यंत परतायचे. 

३. एका कुकरमध्ये थोडे तूप घ्यायचे. त्यात अगदी थोडे तेलही घालायचे. नाही घातले तरी चालेल. तुपावर काळी मिरी, तमालपत्र, लवंग, वेलची सगळे खडे मसाले परतून घ्यायचे. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. किसलेले आले घालायचे. लसणाच्या पाकळ्या घालायच्या. छान परतून घ्यायचे. मग त्यात चिरलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या. आधी कांदा परतून घ्यायचा. मग सिमला मिरची घाला तसेच गाजर व फरसबी घाला. फुलकोबी घाला सगळ्या भाज्या परता. सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा. आता पनीर व सोयाबिन घालून दोन मिनिटे परता. मग तांदूळ घालायचे. पाणी घाला आणि ढवळा मारा एक उकळी आली की कुकर लावा आणि पुलाव मस्त शिजू द्या.

४. पुलाव शिजल्यावर वरती कोथिंबीर घालायची. गरमागरम खायचा. बरोबर रायता घ्या किंवा परतलेला पापड घ्या. लोणचेही छान लागते. 

Web Title: Make a delicious paneer-soybean pulao with your favorite vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.