Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ५ मिनिटांत करा ३ पारंपरिक मराठी गोड पदार्थ, २ पदार्थ तर मुलांच्या शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

५ मिनिटांत करा ३ पारंपरिक मराठी गोड पदार्थ, २ पदार्थ तर मुलांच्या शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

Make 3 traditional Marathi sweets in 5 minutes : अगदी काही मिनिटांत तयार करता येतात हे गोडाचे पदार्थ. पाहा कोणते आहेत आणि कसे करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 13:01 IST2025-06-02T13:00:36+5:302025-06-02T13:01:27+5:30

Make 3 traditional Marathi sweets in 5 minutes : अगदी काही मिनिटांत तयार करता येतात हे गोडाचे पदार्थ. पाहा कोणते आहेत आणि कसे करायचे.

Make 3 traditional Marathi sweets in 5 minutes | ५ मिनिटांत करा ३ पारंपरिक मराठी गोड पदार्थ, २ पदार्थ तर मुलांच्या शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

५ मिनिटांत करा ३ पारंपरिक मराठी गोड पदार्थ, २ पदार्थ तर मुलांच्या शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

रोज काही गोड पदार्थ आपण घरी करत नाही. ताटात एखादा गोड पदार्थ हवा असे वाटले तरी ते करायला फार कष्ट लागतात आणि वेळ जातो. (Make 3 traditional Marathi sweets in 5 minutes)मात्र गोड आवडीने खाणाऱ्यांसाठी अशा रेसिपी आहेत ज्या काही मिनिटांत करता येतात. साहित्यही अगदी कमी लागते. पाहा असे तीन पदार्थ जे पाच मिनिटात तयार होतात. चवीला अगदी छान असतात.   

गूळ भात 

साहित्य
गूळ, तूप, भात, काजू, बदाम, बेदाणे  

१. शिजलेला भात जरा मोकळा करुन घ्यायचा. एका कढईत दोन चमचे तूप घ्यायचे. तुपावर काजू बदाम आणि बेदाणे परतायचे. परतून झाल्यावर एका वाटीत काढून घ्यायचे. त्याच कढईत चमचाभर तूप घ्यायचे आणि मग किसलेला गूळ घालायचा.  

२. गूळ दोन मिनिटे परतला की त्यात भात घालायची थोडे दूध घालायचे आणि परतून घ्यायचे. वरतून पुन्हा थोडे तूप घालायचे. या पद्धतीने एकदा नक्की करुन पाहा. 

गूळ भात करायच्या अनेक पद्धती आहेत. फक्त गूळ व भात कालवूनही गूळ भात केला जातो. किंवा मग भात शिजवतानाच त्यात सगळे पदार्थ घातले जातात. (Make 3 traditional Marathi sweets in 5 minutes)चवीला फार सुंदर लागतो. गूळ अति घालू नका. थोडा बेतानेच घालायचा. म्हणजे तोंड अति गोड होत नाही. 

केळीचे शिकरण

साहित्य
केळी, तूप, साखर, दूध

कृती
१. केळ्याची साले काढून घ्यायची आणि केळे कुसकरुन घ्यायचे. अगदी व्यवस्थित कुसकरायचे. त्यात दूध घालायचे आणि चमचाभर पातळ तूप घालायचे. साखर घालायची. छान ढवळायचे. 

२. साखर विरघळायची वाट पाहायची.  साखर विरघळी की खायला घ्यायचे. नुसतेही मस्त लागते तसेच पोळीशी मस्त लागते. 

पोळीचा लाडू
साहित्य
पोळी, गूळ/साखर, तूप

कृती
१. पोळीचे तुकडे करायचे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. पोळी मिक्सरमध्ये फिरवून झाल्यावर त्यात तूप घालायचे. तसेच गूळ किंवा साखर घाला आणि पुन्हा एकदा वाटून घ्या. 

२. अति लगदा करायचा नाही. जरा जाडसर राहू द्या. लगदा केल्यावर त्याचा लाडू वळता येत नाही. मिक्सरच्या भांड्यातून सारण ताटात काढून घ्या आणि लाडू वळून घ्यायचे.     

Web Title: Make 3 traditional Marathi sweets in 5 minutes