गोड पदार्थ तयार करायचे म्हटलं की, बरेच कष्ट घ्यावे लागतात. पटकन तयार झाले असं होत नाही. (Make 2 types of laddus in 30 minutes, quick recipe)संयम ठेवून काम करावं लागतं. नाही तर मग पदार्थ फसतो. सणांना आपण हमखास गोड पदार्थ तयार करतोच. विकत काही आणणं आपल्या भारतीय मनाला पटत नाही. पण आजकाल नाईलाजच असतो. सणासूदीच्या दिवशीही ऑफिस काम असतचं. आणि ते काम करणं भाग आहे. आदल्या दिवशी तयार करायचे म्हटले तरी, घरी यायलाच फार उशीर होतो. मग अशावेळी झटपट लाडू तयार करता येतात. (Make 2 types of laddus in 30 minutes, quick recipe)फार आटवा- आटवीचा प्रकारच नाही. लगेच तयार होतात.
१. नारळाचे लाडूसाहित्यडेसिकेटेड कोकोनट, तूप, दूध, साखर, मिल्क पावडर
कृती१. नारळाचे लाडू तयार करायला जरी वेळ लागला तरी, डेसिकेटेड कोकोनटचा वापर करून झटपट तयार होतात. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळतो.२. एका कढईमध्ये तूप घ्या. त्यावरती डेसिकेटेड कोकोनट घालून मस्त परतून घ्या. मंद आचेवरच परता कढई फार गरम झाली तर गॅस बंद करा. डेसिकेटेड कोकोनट लगेच करपायला लागतो. तो करपणार नाही याची काळजी घ्या.३. त्यात थोडं दूध घाला. शिजण्यापुरतंच घाला. त्यात साखर घाला. ती पूर्ण विरघळू द्या. त्यात परत थोडं दूध घाला. ते जिरू द्या. मग मिल्क पावडर घाला. ४. कोमट झाल्यावर लाडू वळून घ्या.
२. दाण्याचे लाडू शेंगदाणे, तूप, गूळ
कृती१. दाणे मस्त परतून घ्या. परतून झाले की त्याची साले काढून घ्या. दाण्यांचे कुट तयार करून घ्या. त्याला तेल सुटेपर्यंत वाटू नका. थोडं जाडसरच वाटा.२. एका कढईमध्ये तूप घ्या. त्यावरती शेंदाण्याचे कुट परतून घ्या. नंतर चिरलेला किंवा किसलेला गूळ घाला. मिश्रण मस्त परतून घ्या. गार झालं की त्याचे लाडू वळून घ्या.
देवासाठी प्रसाद दाखवण्यासाठी पटकन असे लाडू तयार करता येतात. तसेच गोड खाण्याची इच्छा असेल तरी, पटकन तयार करता येतात. दोन्ही लाडू तयार होण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागतो.