Lokmat Sakhi >Food > गणपतीसमोरच्या फळांचे करा २ खास डेझर्ट, प्रसादाचे वेगळे पर्याय आणि फळंही खराब होणार नाहीत

गणपतीसमोरच्या फळांचे करा २ खास डेझर्ट, प्रसादाचे वेगळे पर्याय आणि फळंही खराब होणार नाहीत

Fruit Dessert Ganpati Prasad Recipe Idea : बाप्पासमोरच्या फळांचे काय करायचे असा प्रश्न आपल्यापुढे साहजिकच पडतो. अशावेळी या फळांचे सगळ्यांना आवडतील असे झटपट २ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 01:22 PM2022-09-01T13:22:57+5:302022-09-01T13:44:32+5:30

Fruit Dessert Ganpati Prasad Recipe Idea : बाप्पासमोरच्या फळांचे काय करायचे असा प्रश्न आपल्यापुढे साहजिकच पडतो. अशावेळी या फळांचे सगळ्यांना आवडतील असे झटपट २ पदार्थ

Make 2 special desserts of fruits in front of Ganapati, different options of prasad and the fruits will not spoil either | गणपतीसमोरच्या फळांचे करा २ खास डेझर्ट, प्रसादाचे वेगळे पर्याय आणि फळंही खराब होणार नाहीत

गणपतीसमोरच्या फळांचे करा २ खास डेझर्ट, प्रसादाचे वेगळे पर्याय आणि फळंही खराब होणार नाहीत

Highlightsचेरी, टुटी फ्रूटी, सुकामेवा असे काही घालून तुम्ही डेकोरेशनही करु शकता. फळं ही लवकर खराब होणारी गोष्ट असल्याने त्याचे वेळीच काहीतरी करावे लागते.

गणेश चतुर्थीला आपल्यापैकी अनेकांच्या घरी, सोसायटीमध्ये, ऑफीसमध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची स्थापना होते. गणपतीची प्रतिष्ठापना करताना आपण बाप्पाला मोदकांबरोबरच ५ फळांचाही नैवेद्य दाखवतो. ही फळं दुसऱ्या दिवशीपर्यंत साधारणपणे चांगली राहतात. मात्र त्यानंतर या फळांवर चिलटं लागणं, मुंग्या येणं असं सुरू होतं. त्यातच सध्या अचानक पाऊस तर कधी एकदम ऊन असा वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने ही फळं लवकर खराब होण्याची शक्यता असते. याशिवाय घरी कोणी पाहुणे आले तर तेही अनेकदा बाप्पाला प्रसाद म्हणून फळे आणतात. अशावेळी या सगळ्या फळांचे काय करायचे असा प्रश्न आपल्यापुढे साहजिकच पडतो. अशावेळी या फळांचे सगळ्यांना आवडतील असे झटपट २ पदार्थ कसे करता येतील ते पाहूया (Fruit Dessert Ganpati Prasad Recipe Idea)...

(Image : Google)
(Image : Google)

१. पारंपरिक फ्रूटसॅलेड

चिकू, केळी, पपई, डाळींब, सफरचंद यांसारखी फळे फ्रूटसॅलेड करण्यासाठी आपण नेहमी वापरतो. ही सगळी फळं बारीक चिरुन त्यामध्ये साखर घालून ठेवावी. त्यानंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर किंवा लिक्वीड कस्टर्ड घालावे म्हणजे या फ्रूटसॅलेडला घट्टपणा येतो. नंतर आवश्यकतेनुसार यामध्ये सुकामेवा, दूध, केशर यांसारख्या गोष्टी घालाव्यात. प्रसाद म्हणून किंवा एखाद्या जेवणात गोड पदार्थ म्हणून आपण नक्कीच हे फ्रूटसॅलेड घेऊ शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ विकतच्या गोड पदार्थांपेक्षा केव्हाही चांगला. 

(Image : Google)
(Image : Google)

२. आगळंवेगळं फ्रूट पुडींग

सगळ्या फळांच्या बारीक फोडी करायच्या. मारीच्या बिस्कीटांचाही ओबडधोबड चुरा करायचा. एका वाटीत दुधावरची फ्रेश साय फेटून घ्यायची. फळांच्या फोडी बुडतील इतका साखरेचा पाक करुन त्यामध्ये या फोडी घालायच्या. एका मोठ्या डब्यामध्ये खाली बिस्कीटांचा थर देऊन त्यावर पाकातल्या फळांचा आणि मग सायीचा थर द्यायचा. याच क्रमाने साधारणपणे ३ ते ४ वेळा सगळे थर एकमेकांवर द्यायचे. हा डबा फ्रीजमध्ये ७ ते ८ तासांसाठी सेट होण्याकरता ठेवायचा. नंतर हे डेझर्ट खायला घ्यायचे. यावर तुम्हाला आवडत असेल तर चेरी, टुटी फ्रूटी, सुकामेवा असे काही घालून तुम्ही डेकोरेशनही करु शकता. 

Web Title: Make 2 special desserts of fruits in front of Ganapati, different options of prasad and the fruits will not spoil either

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.