Lokmat Sakhi >Food > साबुदाणा वडा तळताना फुटतो- तेल अंगावर उडून पोळतं? ४ टिप्स- न फुटता वडे खमंग तळून होतील 

साबुदाणा वडा तळताना फुटतो- तेल अंगावर उडून पोळतं? ४ टिप्स- न फुटता वडे खमंग तळून होतील 

Mahashivratri Fast 2025: साबुदाणा वडा तळताना फटकन फुटतो आणि अंगावर तेल उडून चांगलाच चटका बसतो. असा अनुभव आजवर अनेकजणींना आला आहे (4 tips to make perfect sabudana vada)... म्हणूनच या काही खास टिप्स...(why sabudana vada get burst while deep frying?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 15:26 IST2025-02-25T15:25:15+5:302025-02-25T15:26:14+5:30

Mahashivratri Fast 2025: साबुदाणा वडा तळताना फटकन फुटतो आणि अंगावर तेल उडून चांगलाच चटका बसतो. असा अनुभव आजवर अनेकजणींना आला आहे (4 tips to make perfect sabudana vada)... म्हणूनच या काही खास टिप्स...(why sabudana vada get burst while deep frying?)

Mahashivratri Fast 2025, 4 tips to make perfect sabudana vada, why sabudana vada get burst while deep frying? | साबुदाणा वडा तळताना फुटतो- तेल अंगावर उडून पोळतं? ४ टिप्स- न फुटता वडे खमंग तळून होतील 

साबुदाणा वडा तळताना फुटतो- तेल अंगावर उडून पोळतं? ४ टिप्स- न फुटता वडे खमंग तळून होतील 

Highlightsसाबुदाणा वडा तळताना फुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी या काही खास टिप्स

महाशिवरात्रीचा उपवास (Mahashivratri Fast 2025) म्हटलं की घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू होते. उपवासाचे थालिपीठ, भगर- आमटी, रताळ्याच्या फोडी, बटाट्याचा किस, साबुदाण्याची उसळ किंवा खिचडी असे कित्येक पदार्थ घरात होत असले तरी अनेकांच्या नजरा मात्र साबुदाणा वड्यावर असतात. कारण खमंग, कुरकुरीत साबुदाणा वडे आणि त्यासोबत आंबट- गोड दही हे उपवासाच्या दिवशीचं मुख्य आकर्षण असतं. पण साबुदाणे वडे तळणं हे अनेकींना मोठं कठीण काम वाटतं आणि त्या अगदी घाबरतच वडे तळतात. कारण वडे तळताना ते फुटतात आणि तेल अंगावर उडून चटका बसतो असा अनेकींचा अनुभव आहे (4 tips to make perfect sabudana vada). हा अनुभव तुम्हालाही येत असेल तर तळताना वडा फुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी या काही खास टिप्स एकदा बघाच..(why sabudana vada get burst while deep frying?) 

साबुदाणा वडा फुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

 

१. साबुदाणा वडा करायचा असो किंवा मग साबुदाण्याची खिचडी करायची असो.. दोन्ही रेसिपींसाठी साबुदाणा व्यवस्थित भिजला जाणं खूप गरजेचं आहे. जर साबुदाणा ७ ते ८ तास पाण्यात व्यवस्थित भिजवला जाऊन छान मऊ झाला असेल तर तळताना वडे फुटण्याचा धोका बराच कमी असतो.

महाशिवरात्रीला साबुदाणे वडे, चिप्स तळल्यावर कढईला करपट डाग पडणारच- २ उपाय, कढई चकाचक

२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडे तयार करण्यासाठी तुम्ही जे साबुदाणा आणि उकडलेल्या बटाट्याचं सारण वापरणार आहात ते अगदी एकजीव झालेलं असावं. यासाठी उकडलेले बटाटे हातानेच फोडून किंवा मॅश करून घेण्यापेक्षा किसून घ्या. कारण उकडलेल्या बटाट्याचा किस आणि साबुदाण हे दोन्ही छान एकजीव होतात. अशा एकजीव झालेल्या मिश्रणाचे वडे फुटत नाहीत.

 

३. साबुदाणे वडे तयार करताना त्यात अख्ख्या शेंगदाण्याचा वापर करणे टाळावे. त्याऐवजी वड्यांच्या सारणामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाडाभरडा कूट घालावा. कधी कधी शेंगदाण्यामुळेही वडा तळताना फुटू शकतो.

महाशिवरात्र विशेष रांगोळी डिझाईन्स- अवघ्या १० मिनिटांत काढून होतील अशा सोप्या, सुंदर रांगोळ्या

४. साबुदाणे वडे करताना त्यात मिरचीचे तुकडे घालू नका. त्याऐवजी मिरची मिक्सरमधून काढून तिची पेस्ट घाला. कारण मिरचीचा तुकडा वड्यासोबत तळला जात असताना अनेकदा फुटतो आणि वर उडून येतो. 

 

Web Title: Mahashivratri Fast 2025, 4 tips to make perfect sabudana vada, why sabudana vada get burst while deep frying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.