Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > साऊथ इंडियन 'चो-चो भात' आणि महाराष्ट्रात 'टोमॅटो उपमा' - सकाळच्या नाश्त्यासाठी खास पदार्थ, झटपट रेसिपी

साऊथ इंडियन 'चो-चो भात' आणि महाराष्ट्रात 'टोमॅटो उपमा' - सकाळच्या नाश्त्यासाठी खास पदार्थ, झटपट रेसिपी

South Indian breakfast: Tomato upma recipe: Indian breakfast recipes: साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आपल्याला 'टोमॅटो उपमा' किंवा मसाला उपम्याची चव सहज चाखायला मिळते.कसा बनवायचा पाहूया साहित्य आणि कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2026 17:12 IST2026-02-06T09:30:00+5:302026-02-06T17:12:08+5:30

South Indian breakfast: Tomato upma recipe: Indian breakfast recipes: साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आपल्याला 'टोमॅटो उपमा' किंवा मसाला उपम्याची चव सहज चाखायला मिळते.कसा बनवायचा पाहूया साहित्य आणि कृती

Maharashtrian tomato upma quick recipe easy Indian breakfast dishes for busy mornings traditional South Indian breakfast ideas tomato upma recipe homemade Indian breakfast recipes | साऊथ इंडियन 'चो-चो भात' आणि महाराष्ट्रात 'टोमॅटो उपमा' - सकाळच्या नाश्त्यासाठी खास पदार्थ, झटपट रेसिपी

साऊथ इंडियन 'चो-चो भात' आणि महाराष्ट्रात 'टोमॅटो उपमा' - सकाळच्या नाश्त्यासाठी खास पदार्थ, झटपट रेसिपी

प्रांत बदलले की पदार्थांची चव देखील बदलते. त्यातीलच एक टोमॅटो उपमा. टोमॅटो उपमा हा प्रामुख्याने दक्षिण भारतातील खाद्यसंस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय पदार्थ. याचं मूळ जरी दक्षिण भारतात असले, तरी तो संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो.(South Indian breakfast) कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये उपमा हा रोजच्या नाश्त्याचा मुख्य पदार्थ. विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये 'टोमॅटो उपमा' खूप जास्त लोकप्रिय आहे. (Tomato upma recipe)
कर्नाटकात याला 'खारा भात' असेही म्हणतात. ही रेसिपी अनेकदा टोमॅटो आणि भाज्या घालून हा चटपटीत उपमा केला जातो. बंगळुरूच्या हॉटेल्समध्ये 'चो-चो भात' म्हणून डिश मिळते, ज्यामध्ये खारा भात आणि गोड शिरा एकत्र सर्व्ह केला जातो.(Indian breakfast recipes) महाराष्ट्रामध्ये याला 'उपीट' किंवा 'तिखट शिरा' म्हटले जाते. सकाळच्या नाश्त्यात किंवा ऑफिसच्या डब्यासाठी महाराष्ट्रात टोमॅटो घालून उपमा बनवण्याची पद्धत खूप जुनी आणि लोकप्रिय आहे. कोणत्याही साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आपल्याला 'टोमॅटो उपमा' किंवा मसाला उपम्याची चव सहज चाखायला मिळते. 

कपभर पोह्यांचा कुरकुरीत वडा आणि आंबट-गोड कैरीची चटणी! खमंग वड्यांची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट बेत

सकाळची सुरुवात जर गरमागरम आणि चविष्ट नाश्त्याने झाली तर आपला दिवस अधिक फ्रेश जातो. भारतीय घरांमध्ये उपमा हा नाश्त्यात हमखास खाल्ला जाणारा पदार्थ. पण रोज तोच तो पांढरा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा टोमॅटो उपमा एकदा खाऊन बघा. कमी वेळात, मोजक्या साहित्यात आणि अधिक पौष्टिकतेने भरलेला हा नाश्ता सगळ्यांना आवडतो. कसा बनवायचा पाहूया साहित्य आणि कृती 

साहित्य 

रवा - १ कप 
टोमॅटो - २
सुकलेली लाल मिरची - ३
तेल - २ चमचे
मोहरी - १ चमचा
चण्याची डाळ - १ चमचा
उडीद डाळ - १ चमचा
हिंग - चवीनुसार 
काजू - ५ ते ६
बारीक चिरलेले आले- १ चमचा
बारीक चिरलेली हिरवी मिरची - १ चमचा 
कढीपत्ता - ५ ते ६ पाने
बारीक चिरलेला गाजर - १ वाटी
बारीक चिरलेली शिमला मिरची - १ वाटी 
हिरवे वाटणे - १ वाटी 
मीठ - चवीनुसार 
हळद - १ चमचा
गरम पाणी - १ कप 
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी टोमॅटो धुवून चिरुन घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सुकलेली लाल मिरची, चिरलेले टोमॅटो घालून त्याची प्युरी तयार करा. 

2. आता कढईत तेल घालून त्यात मोहरी, चण्याची डाळ, उडीद डाळ, हिंग, काजू, आले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतवून घ्या. 

3. त्यात गाजर, शिमला मिरची आणि हिरवे वाटाणे, मीठ, हळद घालून चांगले परतवून घ्या. वरुन टोमॅटोची प्युरी घालून ढवळून घ्या. झाकण ठेवून मिश्रण शिजू द्या. 

4. आता दुसऱ्या भांड्यात रवा चांगला भाजून घ्या. टोमॅटोच्या प्युरीमध्ये वरुन गरम पाणी घाला. त्यात आता भाजलेला रवा हळूहळू घालून चमच्याने एकजीव करा. पुन्हा झाकण झाकून ठेवा. पाणी आटल्यानंतर घट्ट होईल. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 

5. खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा मऊ-लुसलुशीत टोमॅटो उपमा. 
 


Web Title : टमाटर उपमा: महाराष्ट्र में लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता रेसिपी

Web Summary : टमाटर उपमा, एक दक्षिण भारतीय नाश्ता, पूरे भारत में लोकप्रिय है। कर्नाटक में 'खारा भात' और महाराष्ट्र में 'उपिट' के रूप में जाना जाने वाला, यह सूजी, टमाटर और सब्जियों से बना एक त्वरित, पौष्टिक व्यंजन है। यह स्वादिष्ट और आसान सुबह के भोजन के लिए बिल्कुल सही है।

Web Title : Tomato Upma: South Indian breakfast recipe popular in Maharashtra.

Web Summary : Tomato Upma, a South Indian breakfast, is popular across India. Known as 'Khara Bhat' in Karnataka and 'Upit' in Maharashtra, it’s a quick, nutritious dish made with semolina, tomatoes, and vegetables. Perfect for a tasty and easy morning meal.