Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कपभर पोह्यांचा कुरकुरीत वडा आणि आंबट-गोड कैरीची चटणी! खमंग वड्यांची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट बेत

कपभर पोह्यांचा कुरकुरीत वडा आणि आंबट-गोड कैरीची चटणी! खमंग वड्यांची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट बेत

Poha vada recipe: Crispy poha snacks: Evening snack ideas: Maharashtrian snacks: करायला अगदी सोपा आणि लगेच होणारा पदार्थ पोह्यांचा कुरकुरीत वडा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 10:03 IST2026-02-05T10:02:36+5:302026-02-05T10:03:10+5:30

Poha vada recipe: Crispy poha snacks: Evening snack ideas: Maharashtrian snacks: करायला अगदी सोपा आणि लगेच होणारा पदार्थ पोह्यांचा कुरकुरीत वडा.

crispy poha vada recipe at Home how to make poha vada for evening snacks easy poha snacks recipe for tea time homemade crispy poha vada step by step raw mango sweet and sour chutney recipe | कपभर पोह्यांचा कुरकुरीत वडा आणि आंबट-गोड कैरीची चटणी! खमंग वड्यांची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट बेत

कपभर पोह्यांचा कुरकुरीत वडा आणि आंबट-गोड कैरीची चटणी! खमंग वड्यांची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट बेत

संध्याकाळची वेळ, वातावरणातील गारवा आणि गरमागरम चहासोबत आपल्याला कुरकुरीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते.(Poha vada recipe) नेहमीचेच कांदे पोहे किंवा कांदा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्यांचा वडा चांगला पर्याय आहे. 
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स म्हणून काय वेगळं करावं.(Crispy poha snacks) मुलांना रोज डब्यात भाजी-पोळी खाण्याचा देखील वैताग येतो. अशावेळी आपण पोह्यांचा वडा करु शकतो. करायला अगदी सोपा आणि लगेच होणारा पदार्थ पोह्यांचा कुरकुरीत वडा. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Evening snack ideas)

चाळिशीनंतर टाचा दुखतात- चप्पल घालणं नकोसं वाटतं? वॉर्डरोबमध्ये ठेवा ५ प्रकारचे फुटवेअर, लग्नसोहळा ते ऑफिससाठी बेस्ट

साहित्य 

जाड पोहे - दीड कप ट
पाणी - आवश्यकतेनुसार 
तेल- २ मोठे चमचे (फोडणीसाठी)
चणा डाळ- १ मोठा चमचा
मोहरी- १ लहान चमचा
बडीशेप- १/२ लहान चमचा
उडीद डाळ- १ मोठा चमचा
कढीपत्ता- ७-८ पाने
कांदा- १ मोठा (बारीक चिरलेला)
आलं- १ इंच (बारीक चिरलेले)
हिरवी मिरची- २ (बारीक चिरलेली)
साखर- १/२ लहान चमचा
मीठ- चवीनुसार
दही- १ मोठा चमचा 
तेल- तळण्यासाठी

चटणीसाठी साहित्य:
कैरी- १ मध्यम आकाराची
आलं- १/२ इंच
पातीचा कांदा- २-३  (कांद्यासकट)
कोथिंबीर- १/४ कप (बारीक चिरलेली)
तेल- १ मोठा चमचा
दही- २ मोठे चमचे
काळी मिरी पावडर- १/४ लहान चमचा
साखर- १/४ लहान चमचा
मीठ- चवीनुसार


कृती 

1. सगळ्यात आधी बाऊलमध्ये पोहे घेऊन ते व्यवस्थित धुऊन घ्या. यानंतर पोहे दाबून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. धुतलेले पोहे मोठ्या भांड्यात काढून हाताने नीट मॅश करा, ज्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल. 

2. पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात चणाडाळ, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात बडीशेप, उडीद डाळ आणि कढीपत्ता घाला. तयार फोडणी पोह्यांच्या मिश्रणावर घाला. 

3. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं, हिरवी मिरची, साखर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करा. त्यात दही घालून सर्व साहित्य नीट मिसळा. हातावर थोडे मिश्रण घेऊन त्याचे छोटे गोळे करा आणि हाताने दाबून मध्यम आकाराचे वडे तयार करा.

4. पॅनमध्ये तेल गरम करा. तेल तापले की त्यात वडे सोडा. एका बाजूने गोल्डन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने तळून घ्या. तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढून घ्या.

5. कैरीची चटणी बनवण्यासाठी कैरी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्या. बारीक तुकडे करुन त्यात वरील सर्व साहित्य घाला. मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. गरमागरम कुरकुरीत वड्यांसोबत आंबट-गोड कैरीची चटणी खा. 
 

Web Title: crispy poha vada recipe at Home how to make poha vada for evening snacks easy poha snacks recipe for tea time homemade crispy poha vada step by step raw mango sweet and sour chutney recipe