चाळिशीनंतर टाचा दुखतात- चप्पल घालणं नकोसं वाटतं? वॉर्डरोबमध्ये ठेवा ५ प्रकारचे फुटवेअर, लग्नसोहळा ते ऑफिससाठी बेस्ट
Updated:February 5, 2026 10:16 IST2026-02-04T17:37:55+5:302026-02-05T10:16:51+5:30
Footwear after 40: Heel pain solutions: Comfortable footwear for women: आपल्याकडे या ५ प्रकारचे फुटवेअर असायला हवे. ज्या अधिक आरामदायी असतील.

वयाची चाळीशी गाठली की महिलांच्या आयुष्यात एक वेगळीच परिपक्वता येते. ही वेळ स्वत:च्या आरोग्याकडे आणि आवडीकडे अधिक लक्ष देण्याची असते. फॅशनच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ४० नंतर महिलांना केवळ 'स्टाईल' असून चालत नाही, तर 'आराम' (Comfort) अधिक महत्त्वाचा वाटू लागतो.
चुकीच्या चप्पल घातल्यामुळे टाचदुखी, पाठदुखी किंवा पायांना सूज येते. अशावेळी आपल्याकडे या ५ प्रकारचे फुटवेअर असायला हवे. ज्या अधिक आरामदायी असतील.
क्लासिक बॅले फ्लॅट्स हे प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी एव्हरग्रीन आहेत. हे वजनाला हलके असतात आणि कोणत्याही वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवर उठून दिसतात.
आपल्याला उंच दिसायचे असेल तर ब्लॉक हिल्सची निवड करा. याची हिल्स रुंद असल्यामुळे पायांना आधार मिळतो. चालताना त्रास होत नाही. साडी किंवा फॉर्मल पँट्सवर हे खूप रॉयल दिसतात.
पांढरे स्नीकर्स हे जीन्स, कुर्ती किंवा मॅक्सी ड्रेसवरही छान दिसतात. प्रवासात किंवा जास्त वेळ चालण्यासाठी हे सर्वात आरामदायी आणि कूल मानले जातात.
भारतीय सण आणि समारंभांसाठी छान कोल्हापुरी चप्पल किंवा नक्षीकाम केलेली मोजडी असायलाच हवी. ही कुर्ती-प्लाझो किंवा साडीवर अतिशय सुंदर दिसतात.
प्रोफेशनल आणि थोडा 'बॉसी' लूक हवा असेल, तर लोफर्स नक्की ट्राय करा. फॉर्मल कपड्यांवर हे छान दिसतात.