Lokmat Sakhi >Food > काकडीचे थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी, भाजणीच्या थालीपीठसारखेच खमंग पौष्टिक - नाश्ता चमचमीत

काकडीचे थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी, भाजणीच्या थालीपीठसारखेच खमंग पौष्टिक - नाश्ता चमचमीत

Maharashtrian Kakdi Thalipeeth Recipe : झटपट करा काकडीचे थालीपीठ, तांदूळ पीठ आणि काकडीचा मस्त पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 12:50 PM2024-01-10T12:50:36+5:302024-01-10T12:51:34+5:30

Maharashtrian Kakdi Thalipeeth Recipe : झटपट करा काकडीचे थालीपीठ, तांदूळ पीठ आणि काकडीचा मस्त पदार्थ

Maharashtrian Kakdi Thalipeeth Recipe | काकडीचे थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी, भाजणीच्या थालीपीठसारखेच खमंग पौष्टिक - नाश्ता चमचमीत

काकडीचे थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी, भाजणीच्या थालीपीठसारखेच खमंग पौष्टिक - नाश्ता चमचमीत

काकडीचा (Cucumber Recipe) वापर आपण सहसा सॅलॅड किंवा इतर कोशिंबीरीचे प्रकार तयार करण्यासाठी करतो. काकडी म्हटलं की अनेकांच्या डोक्यात येतं ते म्हणजे कोशिंबीर, पण आपण कधी काकडीचे थालीपीठ करून पाहिलं आहे का? काकडी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. काकडीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी यासारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

बरेच जण हिवाळ्यात काकडी खाणं टाळतात. जर आपल्याला दह्यामध्ये मिसळून किंवा त्याची कोशिंबीर तयार करायची नसेल तर एकदा खमंग थालीपीठ करून पाहा (Kakdiche Thaalipeeth). थालीपीठ करण्यासाठी आपल्याला भाजणीच्या पिठाची काहीच गरज पडणार नाही (Cooking Tips), शिवाय कणिक न मळताही आपण काकडीचे थालीपीठ तयार करू शकता(Maharashtrian Kakdi Thalipeeth Recipe).

काकडीचे थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य

काकडी

तांदुळाचं पीठ

बेसन

हिरवी मिरची - आलं पेस्ट

हळद

धणे पूड

मीठ

स्वयंपाकाला फार तेल लागतं? ५ टिप्स- कमी तेलात भाज्या होतील चमचमीत, वडे-पुऱ्याही फुगतील टम्म

जिरे पावडर

लिंबाचा रस

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, काकडीचा किस तयार करा. एका बाऊलमध्ये काकडीचा किस घ्या. त्यात एक वाटी तांदुळाचं पीठ, अर्धा कप बेसन, एक चमचा हिरवी मिरची - आलं पेस्ट, चिमुटभर हळद, एक चमचा धणे पूड, एक चमचा मीठ, एक चमचा जिरे पावडर, एक चमचा लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी घालून बॅटर तयार करा. ज्याप्रमाणे आपण डोश्याचे बॅटर तयार करतो, त्याचप्रमाणे बॅटर तयार करा.

डाळ-तांदूळ न भिजवता, कपभर रव्याचे करा इन्स्टंट ताकातले अप्पे..चवीला भारी-बनतील १० मिनिटात

दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर चमच्याने बॅटर पसरवा, व दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे काकडीचे थालीपीठ खाण्यासाठी रेडी. आपण हे थालीपीठ आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: Maharashtrian Kakdi Thalipeeth Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.