पावसाळा असल्यामुळे सध्या बाजारात हिरव्या पालेभाज्या अगदी ताज्या मिळतात. याच हिरव्या पालेभाज्यांसोबत आपण अळूची पाने देखील विकत घेतो. अळूची पानं आणल्यावर हमखास घरोघरी अळूवडीचा बेत केला जातो. अळूवडी हा पारंपरिक मराठी पदार्थ आहे, जो चविष्ट, कुरकुरीत आणि अगदी खास प्रसंगी (Maharashtrian alu vadi recipe) तयार केला जातो. अळूच्या पानांमध्ये भरले जाणारे सारण यामध्येच अळुवडीची अस्सल (Perfect Alu Vadi Recipe) चव लपलेली असते. अळुवडीमध्ये भरले जाणारे सरणचं जर अगदी परफेक्ट, चविष्ट झाले असेल तर (How To Make Alu Vadi At Home)अळूवडी चविष्ट, रुचकर लागतेच. तेच याउलट, जर सारण फसले तर अळुवडीची चव बिघडते आणि अळूवडी फसते. आपल्यापैकी अनेक गृहिणींची तक्रार असते की, अळूवडीचे सारण नेहमी बिघडते, पाहिजे तशी चव येत नाही.
परंतु अनेकदा सारण नीट मिसळले जात नाही, त्यातील घटकांचे प्रमाण योग्य नसते, किंवा चव फिकी पडते – यामुळे अळूवडी तितकीशी टेस्टी होत नाही. यासाठीच, अळूवडी स्वादिष्ट व्हावी, बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ लागावी, यासाठी सारण तयार करण्याची योग्य पद्धत व प्रमाण माहित असणे फार महत्त्वाचे असते. सारण चुकलं, तर अळूवडी कोरडी, कडवट किंवा बेचव होण्याची शक्यता असते म्हणूनच, अळूवडी कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारी हवी असेल, तर सारणाची तयारी अगदी परफेक्ट हवीच!
साहित्य :-
१. बेसन - १ कप
२. लाल मिरची पावडर - ३ टेबलस्पून
३. धणेपूड - २ टेबलस्पून
४. जिरेपूड - २ टेबलस्पून
५. गूळ - १ टेबलस्पून (किसून बारीक केलेला)
६. हळद - १ टेबलस्पून
७. मीठ - चवीनुसार
८. चिंचेचा कोळ - २ टेबलस्पून
९. कोकमचे पाणी - १ टेबलस्पून
१०. पाणी - गरजेनुसार
१२. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
पावसाळ्यातही परफेक्ट दही विरजण्यासाठी ५ टिप्स, घट्ट-गोडसर मस्त दही लागेल रोज...
पावसाळ्यात डाळी - कडधान्य खराब होतात? डब्यात ठेवा ७ पदार्थ- अळ्या-किडे-बुरशीचा त्रास नाही...
कृती :-
सगळ्यांतआधी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन पीठ घ्यावे. या बेसन पिठात लाल मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड, किसून बारीक केलेला गूळ, हळद, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, कोकमचे पाणी, पांढरे तीळ गरजेनुसार पाणी घालून हे सगळे जिन्नस एकत्रित कालवून घ्यावे. अळूवडी तयार करण्यासाठी अळूच्या पनांना लावण्यासाठीचे परफेक्ट सारण तयार आहे. हे तयार सारण आपण पानांना लावून खमंग चवीची अळूवडी घरच्याघरीच झटपट तयार करु शकतो.
अळूवडी अधिकच चविष्ट करण्यासाठी लक्षात ठेवा...
१. सारणासाठी बेसन हा मुख्य पदार्थ आहे. फार जास्त बेसन घातल्यास सारण कोरडं लागतं आणि फार कमी घातल्यास चिकट होऊ शकतं.
यासाठी ४ ते ५ अळूच्या पानांसाठी अंदाजे १ कप बेसन पुरेसे असते.
२. सारणात थोडी हिरवी मिरची व आलं लसूण पेस्ट घातल्यास अळूवडीचा स्वाद अधिक खुलतो. ही पेस्ट थोड्या तेलात परतून वापरल्यास वाडीची चव अतिशय चांगली लागते.
३. थोडक तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, जिरे, आणि थोडे तीळ घालून फोडणी द्या. त्यात बेसन घालून थोडंसं परतून घ्या. यामुळे बेसनाचा कच्चा वास निघतो आणि चव चांगली येते.
लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...
४. सारण थोडं घट्ट आणि बांधून ठेवण्यासाठी काहीजण थोडंसं तांदळाचं पीठ (१ ते २ चमचे) घालतात. यामुळे वडी नीट वळते आणि चवीला अप्रतिम लागते.
५. सगळ्यांत शेवटी सारणात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं घालावं यामुळे अळूवडीचा खमंग वास दरवळतो तसेच चवही सुंदर लागते.