Join us

Maggi mirchi : आता हेच बाकी होतं! व्हायरल होतेय भरलेल्या मॅगी मिरचीची रेसिपी; फोटो पाहताच लोक म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:36 IST

Maggi mirchi : मॅगी मिरचीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून बहुतेक लोक संतापले आहेत

खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण काही लोक असे काही विचित्र प्रयोग जे पाहून काय बोलावं सुचत नाही. मॅगी ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला खायला आवडते. मुले असोत किंवा मोठी माणसं, मॅगी प्रत्येकाची आवडती असते. मॅगी बनवणे जेवढे सोपे आहे तेवढेच चविष्टही आहे. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे मॅगी. १० मिनिटात भूक शांत करण्याचा सोपा उपाय म्हणून मॅगी कडे पाहिले जाते. 

मात्र, सध्या मॅगीच्या विचित्र रेसेपीज सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच, मॅगी गोलगप्पा सोशल मीडियावर व्हायरल झाला, ही रेसिपी पाहून अनेकांची डोकी फिरली. आता भरलेली मॅगी मिरची सोशल मीडियावर चर्चेत आहे. नूडल्सची आणखी एक नवीन रेसेपी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पारंपारिक भरलेल्या मिरचीला एक वेगळा ट्विट केली आहे.

या नवीन प्रकारात हिरवी मिरची भरून मॅगी बनवली जाते आणि त्याला रावण मॅगी मिर्च असे नाव देण्यात आले आहे. आता या भरलेल्या मॅगी मिरचीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'पैशांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरवेअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स 

मॅगी मिरचीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून बहुतेक लोक संतापले आहेत आणि आपला राग व्यक्त करत आहेत. या व्यतिरिक्त कमेंट् करताना, काही लोकांनी इतर विचित्र मॅगी कॉम्बो देखील शेअर केले. असे बरेच लोक आहेत ज्यांना या कॉम्बोला काहीच हरकत वाटत नाही. 'प्रीती, चुन्नी ठीक करो', व्हायरल होतंय मुंबई पोलिसांचं ट्विट; महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनोखा संदेश 

टॅग्स :अन्नसोशल व्हायरलसोशल मीडिया