भाज्या न खाणाऱ्या मुलांना पालेभाज्या खाऊ घालणं हे आयांसाठी मोठं आव्हान असतं. पण जेवढ्या पालेभाज्या पोटात जातील, तेवढी मुलांची सर्वांगीण वाढ होईल. सगळी पोषणतत्त्व त्यांच्या शरीराला मिळतील. यासाठी नवनवीन रेसेपी ट्राय करणे हा एकच मार्ग आहे. पालकाची कोरडी भाजी पाहून तोंड वेंगाडणारी मुलं हा पालक पुडला आवडीने खातील याची गॅरेंटी! पाहूया रेसेपी -
पालक पुडला रेसेपी
साहित्य :
२ कप बारीक चिरलेला पालक, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप बारीक चिरलेला पातीचा कांदा, चार लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, आल्याचे बारीक चिरलेले तुकडे, दोन बारीक चिरलेल्या मिरच्या, दोन चमचे कसुरी मेथी, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, हिंग, ओवा, तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती :
>> सर्वप्रथम एका पातेल्यात २ कप बारीक चिरलेला पालक, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप बारीक चिरलेला पातीचा कांदा, चार लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, आल्याचे बारीक चिरलेले तुकडे, दोन बारीक चिरलेल्या मिरच्या, दोन चमचे कसुरी मेथी एकत्र करून घ्या.
>> त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि हिंग घाला.
>> पाऊण कप बेसन आणि पाव कप तांदळाचे पीठ घाला.
>> हिरव्या भाज्या जास्त असल्याने मीठ, मसाले पडल्यामुळे त्यांना पाणी सुटेल आणि पुडला बॅटर बनवण्यासाठी जास्त पाणी लागणार नाही.
>> डोसा बॅटर सारखे बॅटर तयार होईल अशा बेताने आवश्यक तेवढे पाणी घाला.
>> तवा गरम झाल्यावर त्यावर हे बॅटर घाला, दोन्ही बाजूने तेल लावून व्यवस्थित शिजवून घ्या.
>> तयार पालक पुडला पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर खायला द्या.
पहा व्हिडिओ -
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/634917502974178/}}}}