Join us  

चवळी भिजत न घालता, झणझणीत हॉटेलस्टाईल उसळ करण्याची सोपी कृती; १० मिनिटात उसळ तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 12:56 PM

Lobia Curry In Pressure Cooker - Punjabi Style Black Eyed Peas Curry : झणझणीत चवळीची उसळ करायची आहे? मग ही रेसिपी पाहाच..चव अशी की २ पोळ्या एक्स्ट्रा खाल..

व्हेजिटेरियन लोकांसाठी डाळ म्हणजे पोषक तत्वांचा खजिना. डाळी प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजांनी परिपूर्ण असतात. आपण तूर, मूग, कडधान्य यासह इतर डाळींचा आहारात समावेश करतो. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात चवळीची उसळ हमखास केली जाते. कडधान्य प्रेमींना डाळ फार आवडते (Chawlichi Usal). ते आवर्जून चवळीची उसळ आवडीने खातात. चवळीची उसळ खाण्याऱ्यांचा खवय्यावर्ग तसा मोठा आहे (Kitchen Tips and Tricks). पण चवळीची उसळ प्रत्येकाला परफेक्ट करायला जमेल असे नाही (Cooking Tips).

बऱ्याचदा आपण चवळी भिजत घालायला विसरतो. जर आपल्याला चवळी न भिजवता झटपट उसळ तयार करायची असेल तर, एकदा ही रेसिपी नक्कीच पाहा. चमचमीत चवळीची उसळ काही मिनिटात तयार होईल(Lobia Curry In Pressure Cooker - Punjabi Style Black Eyed Peas Curry).

चवळीची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य

चवळी

पाणी

मीठ

मोजून १० सेकंदात करा अननसाचे सरबत, कसे-पाहा ही सोपी ट्रिक-उन्हाळा होईल गारेगार

कांदा

लसूण

टोमॅटो

जिरं

तेल

धणे पूड

जिरे पूड

गरम मसाला

कांदा लसूण चटणी

मीठ

कृती

सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात एक कप चवळी घाला. त्यात थोडे पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यात २ कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण बंद करा. कुकरच्या २ शिट्टीमध्ये चवळी शिजेल. आता एका भांड्यात दोन चमचे तेल घाला. नंतर त्यात एक चमचा जिरं, एक चमचा ठेचलेला लसूण, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून साहित्य भाजून घ्या.

साबुदाण्याची भेळ कधी खाल्ली आहे का? खिचडी आणि वडे खाऊन पित्त होत असेल तर भेळ हा उत्तम पर्याय

कांदा लालसर झाल्यानंतर त्यात चमचाभर धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, कांदा लसूण चटणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यात एक कप पाणी घालून गॅस मध्यम आचेवर ठेवा. ५ मिनिटानंतर त्यात कुकरमध्ये शिजवलेली चवळी घालून मिक्स करा. नंतर अर्धा कप पाणी घालून मध्यम आचेवर २ मिनिटांसाठी उसळ शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे भिजत न घालता चवळीची चमचमीत उसळ खाण्यासाठी रेडी. आपण ही उसळ भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स