Lemon Water Mistake: बदलत्या काळात रोज नवनवीन आजार डोकं वर काढत आहेत. अशात लोक आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करतात. वजन कमी करायचं असो, एनर्जी मिळवायची असो, वा शरीरात पाण्याचं संतुलन ठेवायचं असो यासाठी भरपूर लोक रोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पितात. रोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. पण जास्तीत जास्त लोक लिंबू पाणी पिताना एक चूक करतात. ज्यामुळे लिंबू पाण्याचे फायदे मिळण्याऐवजी तोटेच अधिक होतात. आता ही चूक कोणती ते जाणून घेऊ आणि लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धतही जाणून घेऊ.
काय सांगतात एक्सपर्ट?
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यानी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी लिंबू पाणी पिताना लोक कोणती चूक करतात याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, नियमितपणे लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. पण लिंबू पाणी पिताना एक गोष्ट टाळली पाहिजे.
काय टाळावं?
रयान फर्नांडो याच्यानुसार, जास्तीत जास्त लोक लिंबू पाणी पिताना त्यात साखर मिक्स करतात. ज्यामुळे लिंबू पाण्याचे फायदे मिळत नाहीत. त्यांच्यानुसार, लिंबू पाण्यात साखर मिक्स केल्यानं कॅलरी वाढतात, सोबतच साखर शरीरातून हायड्रेशन खेचून घेते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवते.
लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत
रयान फर्नांडो सांगतात की, लिंबू पाणी पिताना त्यात साखर टाकणं टाळलं पाहिजे. खासकरून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे टाळलं पाहिजे. त्याऐवजी लिंबू पाण्यात पिंक सॉल्ट टाकलं पाहिजे. यानं शरीरात सोडिअमचं संतुलन कायम राहतं. तसेच त्यात थोडं नारळाचं पाणी टाकलं पाहिजे. नारळ पाण्यामुळं शरीराला नॅचरल इलेक्ट्रोलाइट मिळतात. ज्यामुळे शरीर दिवसभर हायड्रेट राहतं. अशाप्रकारे लिंबू पाणी पिताना छोटासा बदल करून तुम्ही त्यापासून अधिक फायदे मिळवू शकता.