Lokmat Sakhi >Food > शिळ्या चपातीची खुसखुशीत, खमंग बाकरवडी, चहासोबत खा आणि सांगा कशी मस्त लागली चव...

शिळ्या चपातीची खुसखुशीत, खमंग बाकरवडी, चहासोबत खा आणि सांगा कशी मस्त लागली चव...

Leftover Roti Bhakarwadi : Roti Bhakarwadi Recipe : Here's How You Can Use Leftover Roti To Make Bhakarwadi : CHAPATI CHI BHAKARWADI : Bhakarwadi From Leftover Roti Recipe : चपाती उरली तर, चपातीचा उपमा, फोडणीची चपाती असे पदार्थ नेहमीचेच, ट्राय करा चटपटीत चपातीची बाकरवडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2025 13:51 IST2025-03-18T13:37:54+5:302025-03-18T13:51:04+5:30

Leftover Roti Bhakarwadi : Roti Bhakarwadi Recipe : Here's How You Can Use Leftover Roti To Make Bhakarwadi : CHAPATI CHI BHAKARWADI : Bhakarwadi From Leftover Roti Recipe : चपाती उरली तर, चपातीचा उपमा, फोडणीची चपाती असे पदार्थ नेहमीचेच, ट्राय करा चटपटीत चपातीची बाकरवडी...

Leftover Roti Bhakarwadi Here's How You Can Use Leftover Roti To Make Bhakarwadi Bhakarwadi From Leftover Roti Recipe | शिळ्या चपातीची खुसखुशीत, खमंग बाकरवडी, चहासोबत खा आणि सांगा कशी मस्त लागली चव...

शिळ्या चपातीची खुसखुशीत, खमंग बाकरवडी, चहासोबत खा आणि सांगा कशी मस्त लागली चव...

'चपाती' हा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे. काहीजणांना रोजच्या जेवणात 'चपाती' ही लागतेच. चपाती शिवाय जेवण म्हणजे काहीजणांच अधुरेच वाटते. चपाती हा प्रत्येक घरात (Leftover Roti Bhakarwadi) हमखास केला जाणारा पदार्थ आहे. परंतु काहीवेळा आपल्याकडून जास्तीच्या चपात्या (Bhakarwadi From Leftover Roti Recipe) तयार केल्या जातात, किंवा कुणी चपात्या कमी खाल्ल्या तर त्या उरतात. अशा उरलेल्या चपात्या आपण दुसऱ्या दिवशी खाऊ म्हणून ठेवतो, परंतु या शिळ्या (CHAPATI CHI BHAKARWADI) चपात्या कुणालाच खायला आवडत नाहीत. मग अशा शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून देणे जीवावर येते. अशावेळी आपण या चपातीचे वेगवेगळे पदार्थ करून खातो(: Here's How You Can Use Leftover Roti To Make Bhakarwadi).

कधी चपातीचा उपमा तर कधी फोडणीची चपाती असे पदार्थ नाश्त्याला केले जातात. परंतु जर चपात्या जास्तच उरल्या तर आपण या चपात्यांची चक्क ३ ते ४ दिवस टिकणारी अशी कुरकुरीत बाकरवडी तयार करु शकतो. ही चटपटीत - मसालेदार बाकरवडी आपण चहासोबत नाश्त्याला देखील खाऊ शकतो. अशाप्रकारे, उरलेल्या चपातीची बाकरवडी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. उरलेल्या चपात्या - ४ ते ५ चपात्या 
२. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या 
३. आलं - २ लहान तुकडे 
४. लसूण पाकळ्या - ६ ते ७ पाकळ्या 
५. बेसन - १ कप 
६. पाणी - गरजेनुसार 
७. हळद - १ टेबलस्पून  
८. मीठ - चवीनुसार  
९. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून  
१०. गरम मसाला - १ टेबलस्पून  
११. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)  
१२. चिंच - गुळाची गोड चटणी - २ ते ३ टेबलस्पून 
१३. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
१४. तेल - तळण्यासाठी 

मालवणी पद्धतीची ओल्या काजूची झक्कास उसळ, पाहा अस्सल पारंपरिक चमचमीत पदार्थ...


यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...

कृती :-

१. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पाकळ्या घालूंन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 
२. आता एका बाऊलमध्ये बेसन आणि पाणी घेऊन त्याची थोडी घट्टसर पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टमध्ये हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, गरम मसाला आणि आलं - लसूण - हिरव्या मिरचीची तयार पेस्ट घालावी.  
३. त्यानंतर या पेस्टमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालवी. 

४. आता शिल्लक राहिलेल्या चपात्यांवर चिंच - गुळाची चटणी व्यवस्थिती पसरवून लावावी. मग त्यावर बेसनाची तयार पेस्ट पसरवून लावावी. 
५. त्यानंतर वरून पांढरे तीळ भुरभुरवून घ्यावेत. मग या चपातीला गोलाकार आकारात रोल करावे. रोल केलेल्या चपातीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. बाकरवडी प्रमाणेच गोलाकार तुकडे करून घ्यावेत. 
६. एका कढईत तेल तापवून घ्यावे. या गरम तेलात बाकरवडी सोडून खरपूस तळून घ्यावी. 

उरलेल्या चपातीपासून तयार केलेली ३ ते ४ दिवस टिकणारी बाकरवडी खाण्यासाठी तयार आहे. ही बाकरवडी आपण एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

Web Title: Leftover Roti Bhakarwadi Here's How You Can Use Leftover Roti To Make Bhakarwadi Bhakarwadi From Leftover Roti Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.