Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात मसाला ताक पिणं जास्त फायद्याचं की लस्सी प्यायलेली चांगली? पाहा दोन्हींमधील फरक आणि फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:56 IST

Lassi Vs Chaas In Summer : काही लोकांना असाही प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात ताक आणि लस्सीपैकी शरीरासाठी काय जास्त फायदेशीर ठरेल? तेच जाणून घेऊयात. 

Lassi Vs Chaas In Summer : उन्हाचा पारा वाढला की, शरीराचं तापमान वाढतं. अंगाची लाही लाही होऊ लागते. घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊ लागतं. ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी आणि शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, तसेच शरीर आतून थंड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोक या दिवसांमध्ये ताक किंवा लस्सी पितात. पण काही लोकांना असाही प्रश्न पडतो की, या दिवसांमध्ये ताक आणि लस्सीपैकी शरीरासाठी काय जास्त फायदेशीर ठरेल? तेच जाणून घेऊयात. 

ताक आणि लस्सीमध्ये फरक

ताक आणि लस्सी दोन्ही दह्यापासून बनवलेली पौष्टिक पेये असली तरी, ताक हे दही-पाण्याचे पातळ, मसालेदार आणि पचनास हलके पेय आहे. याउलट लस्सी ही घट्ट, मलाईदार आणि सहसा गोड असते. जी ऊर्जा देते. ताकात जिरं - कोथिंबीर असते, तर लस्सीमध्ये साखर, केशर किंवा फळांचा वापर केला जातो.

ताकाचे फायदे काय?

ताक देशातील काही भागांमध्ये जेवणातील महत्वाचा भाग असतं. दह्यात भरपूर पाणी, काळं मीठ, जिरे पूड, पुदिना टाकून मसाला ताक बनवलं जातं. याचे काय काय फायदे होतात हे पाहुयात.

पचन तंत्र सुधारतं

ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. जे पचन तंत्रासाठी हेल्दी बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे पचन चांगलं होतं. तुम्हाला बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. सोबतच ब्लोटिंग, गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्याही दूर होतात.

शरीर हायड्रेट राहतं

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. ताकामध्ये भरपूर पाणी असतं जे शरीराची पाण्याची गरज भागवतं. पाण्यासोबतच ताकात इलेक्ट्रोलाइट्सही असतात जे शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करतात.

वजन कमी करतं

जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नियमितपणे ताक प्यायला हवं. कारण ताकामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असतं. जे वजन कमी करण्यासाठी चांगलं मानलं जातं. तसेच याने भूक कमी होते आणि मेटाबॉलिज्म मजबूत करण्यास मदत करतं.

लस्सीमधूनही मिळतं पोषण 

लस्सी घट्ट दह्यात साखर टाकून तयार केली जाते. लस्सी केवळ टेस्टी नसते तर याने पोटाला खूप आराम मिळतो. लस्सीचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. ते काय पाहुयात.

एनर्जी बूस्ट होते 

लस्सीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात. जे शरीराला एनर्जी देतात. जर तुम्हाला उन्हामुळे थकल्यासारखं वाटत असेल तर लस्सी पिऊन तुम्हाला एनर्जी मिळेल.

भरपूर पोषक तत्व

लस्सीमध्ये जेवढी मलाई असते आणि जेवढी ती गोड असते, तेवढेच त्यात पोषक तत्वही असतात. लस्सीमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन भरपूर असतात. यात मिनरल्सही भरपूर असतात.

डायजेशनसाठी चांगली

दह्यापासून बनली असल्या कारणाने लस्सीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे गट हेल्थसाठी चांगले असतात. याने तुमचं डायजेशन चांगलं होतं. अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्या दूर होतात.

ताक आणि लस्सीमधून काय निवडायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. दोन्ही ड्रिंक्स तुम्हाला हायड्रेट ठेवतात आणि शक्ती देतात. पण दोन्हींच्या कॅलरीमध्ये खूप फरक आहे. १०० ग्रॅम ताकामध्ये ४० कॅलरी असतात, तर १०० ग्रॅममध्ये लस्सीमध्ये ७७ कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांनी दोन्हीपैकी कशाची निवड करावी याचा विचार करावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chaas or Lassi: Which Summer Drink is Healthier? Benefits & Differences

Web Summary : Both lassi and chaas hydrate and provide energy. Chaas aids digestion with probiotics and fewer calories, ideal for weight loss. Lassi offers quick energy and nutrients but contains more calories. Choose based on your needs.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्ससमर स्पेशल